आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई महापालिका नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी; हजेरीच्या तासांनुसार मिळणार भत्ता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई महापालिका सभागृह सुरू झाल्यानंतर काही मिनिटे बसून  मस्टरवर सही केली की नगरसेवकांची दिवसभराची हजेरी लागून भत्ताही पदरात पडतो. त्यामुळे काही नगरसेवक सभागृहातून लगेच काढता पाय घेत होते. त्यावर उपाय म्हणून मुंबईच्या नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे.  


नव्या पद्धतीत सभागृहात प्रवेश करताना व घरी जाताना नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी लावावी लागणार आहे. सोमवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. पालिकेत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा, विकासकामे व धोरणात्मक निर्णय घेतले जातात. प्रस्ताव, ठराव मंजुरीसाठी सभागृहात नगरसेवकांची पुरेशी संख्या गरजेची असते. सभागृहाच्या बैठकीस केवळ हजेरीची स्वाक्षरी करण्यापुरते उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पक्षांना महत्त्वाच्या प्रस्तावांच्या मंजुरीसाठी व्हीप काढावा लागतो. परिणामी उशिरा येणाऱ्या व लवकर पळ काढणाऱ्या नगरसेवकांना वेसण लावण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...