आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ महादेवन मोजेज बिस्‍त्रो रेस्‍टॉरंटचा सहमालक; म्‍हणाला, तपासात पूर्ण सहकार्य करेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  कमला मिल कंपाऊंड दुर्घटनेप्रकरणी मोजेज बिस्त्रो रेस्‍टॉरंटच्‍या मालकावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. या रेस्‍टॉरंटमध्‍ये गायक सिद्ध‍ार्थ महादेवन याचेही शेअर असल्‍याची माहिती समोर आली आहे. रेस्‍टॉरंटमधील अत्‍यावश्‍यक सुविधांबद्दल निष्‍काळजीपणा करण्‍यात आला होता का? या दृष्‍टीकोणातून पोलिस पुढील तपास करत आहे.

 

यासंबंधी दिव्‍य मराठीशी बोलताना सिद्धार्थ महादेवनने सांगितले की, 'या दुर्घटनेमुळे मला धक्‍का बसला असून मी अत्‍यंत दु:खी झालो आहे. मी सध्‍या शहराबाहेर आहे. त्‍यामुळे नेमके काय घडले याबद्दल पूर्ण माहिती मिळालेली नाही. मी माझ्या काही सहका-यांशी बोललो आहे. आग लागल्‍यानंतर आवश्‍यक होते ते सर्व करण्‍यात आले, अशी माहिती त्‍यांनी दिली आहे. मोजो रेस्‍टॉरंटमधील सर्वजण वेळीच सुखरुप बाहेर पडले, अशी माहिती मला देण्‍यात आली आहे. इतर हॉटेल्‍समध्‍ये काय घडले याची माहिती नाही. ही फार दुर्दैवी घटना आहे.'

 

या दुर्घटनेप्रकरणी रेस्‍टॉरंटच्‍या सुविधांवर बोट ठेवण्‍यात आले आहे. यासंबंधी सिद्धार्थ म्‍हणाला, 'एखाद्या नियमाचे उल्‍लंघन झाले का? याबाबत आताच काही सांगता येणार नाही. माझे सहकारी यासंबंधी माहिती मिळवत आहेत. घटना नेमके कशामुळे घडली हे लवकरच समोर येईल. मात्र आमचा पूर्ण स्‍टाफ आणि ग्राहक वेळीच बाहेर पडले याचा अानंद आहे.'

 

यावेळी सिद्धार्थ महादेवन यांनी तपासामध्‍ये प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्‍याचे आश्‍वासन दिले. ते म्‍हणाले, 'प्रथम सर्वजण तेथून सुरक्षित बाहेर पडावे याकडे आमचे लक्ष आहे. या प्रकरणाच्‍या तपासामध्‍ये आम्‍ही पोलिसांना तसेच मुंबई महापालिकेला पूर्ण सहकार्य करु.'
या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांनी जीव गमावला असून 21 जण गंभीर जखमी झाले आहेत. सिद्धार्थ महादेवन हा प्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन यांचा मुलगा आहे.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, ते रेस्‍टॉरंट कमिश्‍नरच्‍या मुलाचे, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा खळबळजनक आरोप...

 

 

बातम्या आणखी आहेत...