आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री प्रिया प्रकाशनंतर मुंबईची ही तरूणी आली चर्चेत, हे आहे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिया प्रकाश (डावीकडे) आणि आपल्या फेसबुक पोस्टवरून व्हायरल झालेली ऐश्वर्या (उजवीकडे) - Divya Marathi
प्रिया प्रकाश (डावीकडे) आणि आपल्या फेसबुक पोस्टवरून व्हायरल झालेली ऐश्वर्या (उजवीकडे)

मुंबई- सोशल मीडिया एखाद्याला रातोरात स्टार बनवून जातो. याचे ताजे उदहारण म्हणजे आपल्या नयनआदांनी घायाळ करणारी मल्याळम अॅक्ट्रेस प्रिया प्रकाश. प्रियानंतर आता मुंबईतील ऐश्वर्या नावाची तरूणी आपल्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. या कारणामुळे चर्चेत आहे ही तरूणी.....

 

- ऐश्वर्या शर्मा नावाच्या एका तरूणीने मागील आठवड्यात फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती.
- यात तिने लिहले होते की, "दोन मुले माझ्या पाठीमागे बसून बोलत होते. त्यातील एक जण म्हणाला, भाई, मी सुप्रियाला धोका दिला आणि काल (बुधवारी) निधीसोबत फिरायला गेलो होतो. दुसरा मुलगा म्हणतो, भाई तू तर वेडाच आहे. सुप्रियाला तर हे कधी माहितच होणार नाही."
- ऐश्वर्याने पुढे लिहते, 'सुप्रियाला अजिबात माहिती होणार नाही. तर सुप्रिया, जर तुझ्या बॉयफ्रेंडचे नाव अमन आहे आणि जर तुम्ही बुधवारी कुठे एकत्र जाणार होता पण गेला नाही. याचा अर्थ तो तुला धोका देत आहे. तो काळा चष्मा घालतो. "
- ऐश्वर्याने मुबईत राहणा-या लोकांना ही पोस्ट शेयर करण्याचे अपील केले आहे आणि लवकरात लवकर सुप्रियाला शोधून काढण्यास मदत करावी असे म्हटले आहे.

 

व्हायरल झाली ही पोस्ट-

 

- ऐश्वर्याचे ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. आतापर्यंत याला अनेक हजार लोकांनी लाईक आणि शेयर केले आहे. 
- लोकांना हे खूपच मजेशीर वाटले आणि कॉमेंट सेक्शनमध्ये कोणी तरी #SaveSupriya तर कोणी #SupriyaKaBFBewafaHai ट्रेंड चालविण्याच सल्ला दिला. 
- काही लोकांनी सुप्रियाला शोधण्यासाठी सीबीआयची मदत घेण्याचा सल्ला दिला आहे.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ऐश्वर्याची ती पोस्ट आणि तिचे काही निवडक फोटोज...

बातम्या आणखी आहेत...