आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतेमंडळी देव नाहीत, कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही :मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नेतेमंडळी ही काही देव नाहीत, कायद्यांपेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने केली. खारफुटी जंगलावर अतिक्रमण करणारे भाजप नगरसेवक परशुराम म्हात्रे आणि अनिता पाटील यांच्याविरुद्ध एका आठवड्यात पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने दिले. उच्च कोर्ट म्हणाले, राजकारणातील लोक कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत. ते परमेश्वर नाहीत, ना कायदा माेडण्याचा हक्क असलेली व्यक्ती. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यास नगरपालिका व स्थानिक पोलिस का कचरत आहे? तुम्ही निर्भीड असावे आणि कुणालाही भिता कामा नये. 


सामाजिक कार्यकर्ते भरत मोकळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने या टिप्पण्या केल्या. याचिकेनुसार, भाजप नगरसेवक परशुराम म्हात्रे आणि अनिता पाटील 
यांनी खारफुटी झाडे तोडत अतिक्रमण करून बंगले व कार्यालये थाटली आहेत.

बातम्या आणखी आहेत...