आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई कमला मिल दुर्घटना: पूर्वी असे दिसायचे 1 Above पब, आगीमुळे झाले पूर्ण उद्ध्वस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगीपूर्वीचे 1 Above पब - Divya Marathi
आगीपूर्वीचे 1 Above पब

मुंबई- लोअर परळ येथील कमला मिल्‍स कंपाऊंडला  गुरुवारी रात्री 12.30 वाजता लागलेल्‍या भीषण आगीत 14 मृत्‍यूमुखी पडले असून 21 गंभीर जखमी झाले आहेत. या मिलमधील 1 Above या पबला प्रथम आग लागली. नंतर ही आग सर्वत्र पसरली. आगीवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी पबमध्‍ये कोणतेही उपकरणे नव्‍हते.

 

एका रात्रीत स्‍मशान झाली जागा

येथील पबची आता अशी अवस्था झाली आहे की, पाहणा-याला विश्‍वासही बसणार नाही की कधीकाळी येथे लोक नृत्‍य करत होते, गाणे म्‍हणत होते. एका रात्रीच्‍या दुर्घटनेने नेहमी लोकांनी गजबजणा-या या जागेचे स्‍माशानात रुपांतर केले आहे.  येथील एकएक वीट सांगत आहे की, घटना किती भीषण होती आणि लोकांना कोणत्‍या स्थितीतून जावे लागले.

 

कमला मिल्स कंपाऊंड : आग लागताच एकमेकांना चिरडत पळाले लोक, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही या दुर्घटनेबाबत दु:ख व्‍यक्‍त केले आहे. या दुर्घटनेमधील निष्‍काळजीपणाही आता समोर येत असून 1 Above पबच्‍या मालकांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, 1 Above पबचे दुर्घटनेपूर्वीचे व नंतरचे फोटोज..

बातम्या आणखी आहेत...