आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: लोकलमध्ये पत्रकारावर जीवघेणा हल्ला, गर्दीच्या डब्यात शिरल्याने गुंड प्रवाशांचे कृत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकार सुधीर शुक्ला ... - Divya Marathi
पत्रकार सुधीर शुक्ला ...

मुंबई- मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये डब्यात चढण्यावरून व आत शिरल्यानंतर जागेवरून होणारे वाद आता रोजचे ठरले आहेत. मात्र, आता एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला गर्दीच्या डब्यात कशाला चढतोस, असे विचारत जबर मारहाण केली. सुधीर शुक्ला असे या पत्रकाराचे नाव आहे. दरम्यान, या घटनेचा पत्रकार संघटनांनी निषेध व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. मारहाण करणा-या प्रवाशांना तत्काळ अटक करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

 

याबाबतची माहिती अशी की, सुधीर शुक्ला हे मीरा रोडहून अंधेरीला जात होते त्याचवेळी त्यांनी एका लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकलमधील प्रवाशांनी त्यांना गर्दी असल्याचे सांगत गाडीत येण्यास विरोध केला. मात्र, ऑफिसला पोहचायचे असल्याने प्रवाशांचा विरोध झुगारून सुधीर लोकलमध्ये चढले. त्यावेळी प्रवाशांनी त्यांना दमदाटी करण्यास सुरूवात केली. आपण पत्रकार आहोत, महत्त्वाच्या कार्यक्रमाला मला वेळेत पोहचायचे आहे असे सांगतिल्यानंतर प्रवाशांनी त्यांना सुरूवातीला शिवीगाळ व नंतर मारहाण करायला सुरूवात केली. त्याचवेळी शुक्ला यांनी मारहाण करणा-यांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील गुंडांनी त्यांचा मोबाईल खेचून घेतला. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्ला यांची विचारपूस करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. 

बातम्या आणखी आहेत...