आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवी मृत्यूप्रकरण: दाऊदच्या संपत्तीवर बोली लावणाऱ्या बालाकृष्णन यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईत लिलाव झालेल्या दाऊदच्या संपत्तीवर बोली लावणारे ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून श्रीदेवी यांचे पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे.

 


'बाथटब हा फक्त 3 फूट खोल असतो. अशावेळी त्यात कोणी कसा काय बुडू शकतो? तसेच तिच्या शरीरामध्ये अल्कोहलचे प्रमाणंही कमी होते.' असे बालकृष्णन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

 


श्रीदेवीचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हे कट?
'श्रीदेवीचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता, यामागे नक्कीच कोणता तरी मोठा कट आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती सुरुवातीला समोर आली. सर्वांनी जवळपास त्यावर विश्वासही ठेवला. पण हृदयविकाराच्या झटक्याची बातमी कोणी पसरवली? सत्य लपवून ठेवण्यासाठी कुणीतरी नक्कीच खोटे पसरवलं. हा अपघात आहे की खून हे शोधणे पोलिसांचं काम आहे. तसेच आतापर्यंत सीसीटीव्हीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मृत्यूच्या एक ते दोन तास आधी तिच्या रुममध्ये कोणी गेले होते का? याचीही माहिती नाही. त्यामुळे या सर्व गोष्ट संशय निर्माण करतात. तसेच ज्यापद्धतीने दुबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केलीत्यावर देखील अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यांनी चौकशी योग्य पद्धतीने केलेली नाही. हे प्रकरण फारच गंभीर आहे.' असे बालकृष्णन यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 

बातम्या आणखी आहेत...