आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखी कहाणी: मालकिणीच्या शोधासाठी रोज रात्री येथे ही डॉगी, रोज घडते असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनवर रोज रात्री ही डॉगी आपल्या मालकिणीच्या शोधासाठी येत असावी. - Divya Marathi
कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनवर रोज रात्री ही डॉगी आपल्या मालकिणीच्या शोधासाठी येत असावी.

मुंबई- मुंबईतील कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनवर एका डॉगीच्या डेली रूटीनमुळे अचानक चर्चेत आली आहे. ही डॉगी रोज रात्री ठराविक वेळी कांजूरमार्ग स्टेशनवर येणा-या एका खास लोकल ट्रेनचा पाठलाग करते. ट्रेनच्या लेडीज कोचच्या समोर थांबते उतरणा-या महिलांना पाहते. स्टेशनवर दुकान लावणा-या लोकांचे म्हणणे आहे की, ही डॉगी कोणाचा तरी वाट पाहते. कॅमे-यात कैद झाले ही घटना....

 

- कांजूरमार्ग स्टेशनवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात या डॉगीचे कृत्य कैद झाले आहे.
- व्हिडिओमध्ये पाहू शकता की, ही डॉगी दर रोज रात्री 11 वाजता कल्याणकडून येणा-या ट्रेनची प्लटफार्म नंबर 1 वर वाट पाहते.
- ट्रेन स्टेशनवर येताच ती पळत जाऊ लेडीज कोचसमोर थांबते व तेथून उतरणा-या महिलांकडे पाहत बसती.
- नंतर लोक उतरायचे बंद झाल्यानंतर ट्रेनकडे पाहते मात्र, तिला हवी असलेली व्यक्ती दिसत नाही. त्याचवेळी ट्रेन हळू हळू पुढे जाऊ लागते. त्यानंतर ही डॉगी ट्रेनचा पाठलाग करते. ट्रेन वेगाने दूर झाले तरी तिच्याकडे ही डॉगी पाहत थांबते. 
- कदाचित डॉगी तिच्या मालकाला शोधत असावी व ती महिला असावी. त्यामुळेच ती रोज रात्री 11 वाजताची महिला डब्ब्यांपाशी थांबते व तिचा शोध घेते. मात्र, 50 दिवसानंतर तिचा हा शोध सुरू आहे. त्यामुळे संबंधित महिला कोण असावी, ती आपल्या डॉगीला सोडून कुठे गायब झाली आहे का असे अनेक प्रश्न तयार होत आहेत.

 

व्हायरल झाली स्टोरी-

 

- या डॉगीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
- काही लोक तर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना टॅग करून या डॉगीला मदत करण्याचे अपील करत आहेत.
- स्टेशनवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालेल्या घटनानुसार, ही डॉगी मागील 2 जानेवारीपासून रोज रात्री असेच त्याच प्लॅटफॉर्म नंबर 1 वर ट्रेनचा पाठलाग करत आहे.
- कांजूरमार्ग स्टेशनवर रोज प्रवास करणा-या लोकांनी जेव्हा या डॉगीचा पाठलाग केला तेव्हा त्यांना समजले की या डॉगीला 4 पिल्ले आहेत.

 

सेलिब्रिटी बनली डॉगी-

 

- सोशल मीडियात या डॉगीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आतापर्यंत हजारो लोक कांजूरमार्ग स्टेशनवर फक्त या डॉगीला पाहायला जात आहे. 
- रस्त्यावर भटकणा-या कुत्र्यांच्या देखभाल करणा-या एका एनजीओ आता या डॉगी आणि तिच्या 4 पिल्लांची काळजी घेत आहेत. 
- एनजीओच्या लोकांनी सांगितले की, या डॉगीच्या पिल्लांना आम्ही दत्तक देण्याचा विचार करत आहोत.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या डॉगीचे कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीत कैद झालेले क्षण....

बातम्या आणखी आहेत...