आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मुलींना तुम्ही ओळखता का? कल्याण रेल्वे स्थानकात वडिलांनीच सोडल्याचा संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्याण रेल्वे स्थानकावर या चिमुकल्या झोपलेल्या होत्या. - Divya Marathi
कल्याण रेल्वे स्थानकावर या चिमुकल्या झोपलेल्या होत्या.

मुंबई- कल्याण रेल्वे स्थानकात दोन चिमुकल्या मुलींना रेल्वे स्टेशनवर सोडून बाप पसार झाल्याची घटना घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सातवर रविवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

 

 

एक व्यक्ती दोन मुलींना घेऊन येथे आला होता. कसारा दिशेच्या एका पोलखाली त्याने मुलींना बसवले. काही वेळाने मुली झोपी गेल्या, आणि हीच संधी साधत या निर्दयी बापाने तिथून पलायन केले. रात्री दीडच्या सुमारास रेल्वे पोलिस पेट्रोलिंग करत असताना त्यांना दोन चिमुकल्या मुली फलाटावर झोपल्या असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या आजूबाजूला कुणीही आढळून न आल्याने अखेर या दोन मुलींना पोलिसांनी रेल्वे पोलिस ठाण्यात आणले. मात्र अवघ्या दोन आणि तीन वर्षांच्या या मुलींना आपले नावही सांगता येत नाही. त्यामुळे अखेर पोलिसांनी फलाटावरचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यात एक व्यक्ती या मुलींना सोडून जात असल्याचे पोलिसांना आढळले. फोटो बघून मुलींनी पप्पा म्हटल्याने ही व्यक्ती या मुलींचा बाप असल्याचा संशय आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...