आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला म्हणाली, पती करतो असे काही, वाचवा नाही तर रस्त्यावर करेल आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेने या व्हिडीओत आपल्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. - Divya Marathi
महिलेने या व्हिडीओत आपल्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई- पतीकडून जाच होणाऱ्या एका महिलेने आपला एक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओत ही महिला रडत-रडत आपले म्हणणे मांडत आहे. या व्हिडीओत ती आत्महत्या करण्याविषयी बोलत आहेत. चित्रपट निर्माते अशोक पंडीत यांनी हा व्हिडीओ शेअर करत मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे.

 

 

महिला म्हणाली...
- या व्हिडीओत रडणाऱ्या महिलेने मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. तिचे म्हणणे आहे तिने याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली होती पण पोलिसांनी त्याची दखल घेतलेली नाही.
- पीडित महिला म्हणत आहे की, तिला न्याय न मिळाल्यास ती आत्महत्या करेल.
- महिलेने आपला पती शारिरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे. मागील अनेक वर्षांपासून हा छळ होत असल्याचे तिने म्हटले आहे. मी केवळ मुलांच्या भविष्याचा विचार करुन गप्प बसत असल्याचे तिने म्हटले आहे. आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू घेण्यापासूनही पती रोखत असल्याचे तिने म्हटले आहे. 

 

 

मुंबई पोलिस करणार मदत
- या व्हिडीओत महिला म्हणते की, माझे जीवन नरकासारखे आहे. पती माझे जीवनही संपवू शकतात. न्याय न मिळाल्यास मी खारमधील रस्त्यावर जीव देईल.
- मुंबई पोलिसांनी दोषी पतीवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
- मुंबई पोलिसांनीही ही घरगुती हिंसाचाराची घटना असल्याचे म्हटले आहे.
- या महिलेला 3 मुले आहेत. ते एकाच सोसायटीत वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहतात. या महिलेच्या पतीवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

   

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...