आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री  नारायण राणे यांनी राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याबाबत मात्र माहिती देण्यात आलेली नाही. 

 

 

मंत्रिमंडळात समावेश होईल या भाजपच्या आश्वासनानंतर नारायण राणे यांनी काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची मोट बांधली. परंतु भाजपने तारीख पे तारीख असेच सत्र सुरू ठेवल्याने राणे नाराज झाले आहेत. माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, मंत्रिमंडळ समावेशाबाबत लवकर निर्णय घ्या, असा सूर नारायण राणे यांनी लावला आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 

बातम्या आणखी आहेत...