आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न अॅडिक्ट 14 वर्षीय भावाकडून 16 वर्षीय थोरल्या बहिणींवर बलात्कार; नवी मुंबईतील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पॉर्न साईटच्या आहारी गेलेल्या एका 14 वर्षीय भावाने आपल्या 16 वर्षीय थोरल्या सख्या बहिणीवर वारंवार बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेला हा प्रकार संबंधित बहिण गर्भवती राहिल्यानंतर उजेडात आला आहे. संबंधित अल्पवयीन भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, बाल सुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. नवी मुंबईतील कामोठे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे.

 

'मिड डे' ने दिलेल्या वृत्तानुसार, पॉर्न साईटच्या आहारी गेलेला मुलगा आपल्या बहिणीवर मागील काही महिन्यांपासून वारंवार बलात्कार करत होता. चार महिन्यापूर्वी आई-वडिल घरी नसताना सर्वप्रथम भावाने बलात्कार केला होता. या बहिण-भावाचे आई-वडिल दोघेही नोकरी करतात. त्यामुळे ते बहुतांश वेळा दिवसा घराच्या बाहेर असतात. त्यामुळे घरी हे दोघेच बहिण-भाऊ असतात. याच दरम्यान भावाला पॉर्न साईट अॅडिक्टचे व्यसन लागले. चार महिन्यापूर्वी पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर गेली दिवस तो बहिणीवर वारंवार बलात्कार करत होता.

 

दरम्यान, मुलीच्या आरोग्याबाबत काही तक्रारी येऊ लागल्याने आईने तिला दवाखान्यात नेले. त्यावेळी तरूणीच्या विविध तपासण्या केली असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. पहिल्यांदा ही मुलगी याबाबत काहीही बोलायला तयार नव्हती. मात्र, समुपदेशन केल्यानंतर भावाने हे कृत्य केल्याचे आईला सांगितले.

 

यानंतर आईने स्वत:च्याच मुलाविरूद्ध मागील आठवड्यात पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर कामोठे पोलिसांनी त्याला अटक केली मात्र तो अल्पवयीन असल्याने त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे असे डीसीपी तुषार दोषी यांनी सांगितले. 

 

तुषार दोषी यांनी सांगितले की, हे दोघे बहिण-भाऊ कामोठे येथील एकाच शाळेत जातात. आई-वडिल नोकरदार असल्याने दिवसभर घराबाहेर असतात. त्यातच मुलाला पॉर्न साईट पाहण्याचे व्यसन लागले. त्यातून त्याने बहिणीवर अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...