आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HBD पवार साहेब: शिवसेनाप्रमुख त्यांंना म्हणायचे 'मैद्याचे पोते', वाचा मैत्रीच्या आठवणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे संस्‍थापक अध्‍यक्ष शरद पवार यांच्‍यातील मैत्री आणि शाब्‍दिक हल्‍ल्‍ो संपूर्ण महाराष्‍ट्राने पाहिले आहेत. बाळासाहेब आणि शरद पवार यांच्‍यातील घरगुती संबंधही तेवढेच दाट राहिले आहेत. पवार यांनी कित्‍येकदा या बाबींचा खुलासा केला आहे. गेली 5 दशके राज्याच्या व देशाच्या राजकारणात आपल्या गुणवत्तेने व कर्तृत्त्वाने अमीट ठसा उमटवणारे ज्‍येष्‍ठ राजकारणी व राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे संस्‍थापक अध्‍यक्ष शरद पवार यांचा आज (12 डिसेंबर) वाढदिवस.


बाळासाहेबांसोबतच्‍या मैत्रीतील आठवणी शदर पवार कित्‍येकदा सांगतात. निवडणुका आल्या की, त्‍यांच्‍यात शाब्दीक चकमक रंगत असेे. एका लेखात शरद पवार यांनी उल्‍लेख केला आहे की, बाळासाहेबांच्‍या मनाचा मोठेपणा होता; पण आमच्यावर राजकीय हल्ले करताना, व्यंग्यचित्र काढताना "बारामतीचा म्हमद्या', 'मैद्याचे पोते' अशा ठाकरी भाषेत शेलके शब्द वापरताना त्यांनी कधीही कंजुषी केली नाही. व्यक्तिगत मदतीच्‍या वेळीही बाळासाहेबांनी त्‍यांना सहकार्य केले आहे.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, दुर्मिळ फोटोंसह काही आठवणी..
बातम्या आणखी आहेत...