आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार यांनी विमानात साजरा केला बर्थडे; केक कापला पण स्वीकारला नाही एकही गुलाब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा 12 डिसेंबरला 77 वा वाढदिवस होता. पवारांनी आपला वाढदिवस साजरा न करता शेतकर्‍यांच्या प्रश्नावर नागपूरात सरकारवर हल्लाबोल केला. नागपुरात निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्त्व खुद्द शरद पवार यांनी केले. कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हट्टामुळे पवारांनी विमान प्रवासात केक कापून अत्यंत साध्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला.

 

पवारांनी स्वीकारला नाही एकही गुलाब...

भाजप सरकारविराेधात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त जनआक्रोश-हल्लाबोल मोर्चाची मंगळवारी दुपारी 5 वाजता सांगता झाली. शरद पवार व्यासपीठावरून खाली उतरले. व्यासपीठाच्या शेजारी अनिल देशमुख यांची पवारांना जाण्यासाठी आॅडी गाडी लावली होती. पवार सुरक्षा रक्षकाच्या गराड्यात लगबगीत गाडीत बसू लागले, दरम्यान वाढदिवसानिमित्त पवारांना गुलाबफूल देण्यासाठी नेत्यांची चढाओढ लागली. पण पवारांनी एकाचाही गुलाब स्वीकारला नाही, ते थेट गाडीत बसून निघून गेले, त्यामुळे नेत्यांच्या हातातील ताटकळलेले गुलाब अखेर त्यांच्याच हातात राहिले.

 

वाढदिवसाला मोठा डामडौल करत नाहीत...

शरद पवार आपल्या वाढदिवसाला मोठा डामडौल करत नाहीत. पूर्वी ते वाढदिवसाला पुण्यातील बारामती हाॅस्टेलवर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार करत. मंगळवारी जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा आणि पवार यांचा 77 वा वाढदिवस नेमका एकाच दिवशी आला होता. त्यामुळे पवार यांनी वाढदिवसाचा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम ठेवला नव्हता. त्यातच त्यांची तब्येतही ठीक नव्हती. मंगळवारी सकाळीच ते रुग्णालयातून बाहेर पडले होते. सोमवारी त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.


वाढदिवसाला कार्यक्रम ठेवू नये
‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बाबांच्या वाढदिवसाला कोणताही कार्यक्रम ठेवू नये’, अशा सूचना त्यांची कन्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्या होत्या. त्यामुळे पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात एकही बॅनर, फ्लेक्स दिसले नाहीत. नाही म्हणायला व्यासपीठावर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या हस्ते एक गुच्छ देवून पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तो सुद्धा पवार यांनी नाखुषीनेच स्वीकारला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... शरद पवार यांनी विमानात साजरा केला बर्थडे... (व्हिडिओ) सुप्रिया सुळे यांनी बाबांना दिलेल्या शुभेच्छा...

 

बातम्या आणखी आहेत...