आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: आत्महत्या टाळण्यासाठी मंत्रालयाच्या इमारतीला जाळ्या बसविण्याचे काम सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्याचे मंत्रालय सुसाईड पाँईट बनू लागल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. अशा घटना टाळण्यासाठी मंत्रालयाच्या इमारतीच्या भिंतीला जाळ्यांचे आवरण लावले जात आहे. खबरदरीचा उपाय म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे. आजपासून जाळ्या बसविण्यास सुरूवात झाली आहे. 

 

चार दिवसापूर्वी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून पॅरोलवर असलेल्या हर्षल रावते या कैद्याने आत्महत्या केली होती. यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याआधी अहमदनगरच्या 25 वर्षीय अविनाश शेटे या तरूणाने मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. तर, धुळ्याच्या धर्मा पाटील या 84 वर्षीय शेतक-याने मंत्रालयातच विष पिऊन आत्महत्या केली होती. काही महिन्यापूर्वी उस्मानाबादमधील शेतकरी तरूणाने मंत्रालयाच्या इमारतीवरून शोले स्टाईल आंदोलन करत आत्महत्येची धमकी दिली होती.

 

मंत्रालयात येऊन राज्यातील नागरिक आत्महत्या करू लागल्याने हे मंत्रालय आहे आत्महत्यालय अशी टीका होऊ लागली होती. त्यानंतर सरकारने तत्काळ उपाययोजना करत मंत्रालयाच्या इमारतीच्या भिंतींना जाळ्या बसविण्याचे काम सुरू केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...