आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचे नवे व्यंगचित्र, शिवरायांच्या माध्यमातून जातीचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना फटकारे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज ठाकरे यांनी आज त्यांच्या व्यंगचित्रांचा अनुशेष भरून काढण्यासाठीच्या पॅकेजमधील पुढचा  हप्ता दिला. फेसबूकवर राज ठाकरे यांनी पोस्ट केलेल्या या व्यंगचित्रांच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी जातीयवादाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना ब्रशच्या फटकाऱ्यांतून सुनावले आहे. जातीचे राजकारण करून लोकांच्या भाडणांची मजा पाहणाऱ्या नेत्यांवर राज ठाकरे यांनी व्यगचित्रातून आसूड ओढला आहे. 


काय म्हणाले राज ठाकरे..

या व्यंग्यचित्रांबरोबर केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी लिहिले - मी मागे म्हणल्याप्रमाणे, गेल्या एका महिन्यांत अनेक घडामोडी घडल्या, त्याच्यावरच्या माझ्या व्यंगचित्रांचा बॅकलॉग (अनुशेष) शिल्लक होता. सध्याच्या सरकारचं कर्तृत्वच असं की व्यंगचित्रकारांना विषयांची कमतरता जाणवूच शकत नाही.


९ जानेवारी २०१८ च्या माझ्या पोस्टमध्ये मी म्हणलं तसं 'अनुशेष' शिल्लक ठेवणाऱ्यातला मी नाही. १९ जानेवारीला 'हजयात्रेच्या अनुदानावरचं' किंवा २३ जानेवारीचं ‘गुजरात निवडणुक’ निकालांवरचं व्यंगचित्र तुम्ही पाहिलं असेलच. 


पण तरीही अनेक विषयांवर तडाखे द्यायचे बाकी आहेत. त्यातलेच काही माझे 'फटकारे'. तुम्हाला ते आवडतील आणि तुम्ही त्यातून योग्य तो बोध घ्याल अशी मी आशा करतो.


पुढील स्लाइड्सवर पाहा, राज ठाकरे यांनी यापूर्वी काढलेली काही व्यंगचित्रे...

बातम्या आणखी आहेत...