आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिद्रेंच्या मृतदेहाचे मशीनने तुकडे करून खाडीत फेकले; फळशीकरची पोलिसांसमोर कबुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बेपत्ता पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करण्यात आले. त्यानंतर हे तुकडे वसईच्या खाडीमध्ये फेकण्यात आले, अशी कबुली या प्रकरणातील आरोपी महेश फळशीकर याने दिली आहे. फळशीकर हा या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकरचा जवळचा मित्र आहे. त्याला सोमवारी पुण्यातील कात्रज परिसरातून अटक करण्यात आली होती.  


सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी कळंबोली पोलिसांनी गेल्या ७ डिसेंबर रोजी मुख्य आरोपी निलंबित वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक केली होती. त्यानंतर भाजप नेते एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याला १० डिसेंबर रोजी पकडण्यात आले.  २० फेब्रुवारी रोजी कुरुंदकरचा खासगी वाहनचालक कुंदन भंडारी याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी झाल्यानंतर कुरुंदकरचा मित्र महेश फळशीकर याचे नाव पुढे आले होते. आता फळशीकरने या गुन्ह्याची कबुली दिल्याने या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. ५ एप्रिल २०१६ पासून अश्विनी बिंद्र या कळंबोलीतून बेपत्ता झाल्या आहेत. त्यानंतर त्यांचा गेल्या दोन वर्षांपासून शोध  लागत नव्हता.

बातम्या आणखी आहेत...