आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगावच्या चौकशीतून मुख्य सचिवांना वगळा:विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-  भीमा-कोरेगाव दंगलीच्या चौकशी समितीतून राज्याच्या मुख्य सचिवांना वगळण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी गुरुवारी राज्यपालांकडे केली.  
अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक, महिला व बेरोजगारांच्या प्रश्नांवर विखेंनी काँग्रेसच्या आमदारांसह राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी सांगितले की, भीमा-कोरेगाव प्रकरणी राज्य सरकारची भूमिका संदिग्ध आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता त्याची चौकशी विद्यमान न्यायाधीशांमार्फतच होणे आवश्यक होते. परंतु, सरकारने कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश जे.एन. पटेल यांच्या नेतृत्वाखाली द्वी-सदस्यीय समिती नेमली. या समितीत मुख्य सचिवांचा समावेश असल्यामुळे सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,’ अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.  
बातम्या आणखी आहेत...