आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर उरलेल्या तुरीचे पकोडे तळायचे का-विखे पाटील;खरेदीतील मर्यादा रद्द करण्याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना एकरी सरासरी ८ ते १० क्विंटल उत्पादन झाले असताना सरकार त्यातील मोजकीच तूर खरेदी करणार असेल तर उरलेल्या तुरीचे पीठ करून पकोडे तळायचे का? अशी संतप्त विचारणा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी केली.  


तूर खरेदीबाबत एकरी मर्यादा घालणाऱ्या परिपत्रकावरून सरकारवर टीकेची झोड उठवताना विखे पाटील म्हणाले, एक तर मुळात शासकीय तूर खरेदीसाठी उशीर झाला आहे. त्यातच सरकारने शासकीय तूर खरेदीसाठी घातलेली जिल्हानिहाय एकरी मर्यादा शेतकरीविरोधी असून यासंदर्भातील परिपत्रक तातडीने मागे घेतले पाहिजे. या परिपत्रकानुसार खरेदी झाली तर अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याच्या एकूण उत्पादनाच्या एक तृतीयांश तूरदेखील हमीभावाने खरेदी होणार नाही. काहीही झाले तरी आम्ही सरकारला संपूर्ण तूर खरेदी करायला भाग पाडू. सरकार हे परिपत्रक मागे घेणार नसेल तर काँग्रेस पक्ष आंदोलन करेल, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...