आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस- राष्ट्रवादीत आघाडी करण्याबाबत एकमत, भाजपविरोधात मोट बांधून मतविभाजन टाळणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक मंगळवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या बंगल्यावर पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षात आघाडी करण्यासोबतच आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन वाटाघाटी झाल्या. भाजप आणि शिवसेना यांच्यातील अंतर वाढत चालले असताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येण्याची हालचाली सुरू केल्या आहेत.

 

दरम्यान, या घडामोडीसह सद्य स्थितीतील राजकीय स्थितीी पाहता भाजपात हालचाली सुरू झाल्या आहेत. राजस्थानातील धक्‍कादायक पराभवानंतर आता सर्वत्र वातावरण योग्य व्हावे यासाठी लवकरात लवकर वातावरण बदलण्याचे भाजपकडून प्रयत्न केले जाणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यासंदर्भात कोअर कमिटीची बैठक लवकरच घेणार असल्याचे समजते.

 

काँग्रेस- राष्ट्रवादीतील आजच्या या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, माणिकराव ठाकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.

 

आजच्या बैठकीत उभयपक्षातील नेत्यांत काही मतभेद सोडून धर्मनिरपेक्षतेसह भाजपकडून लोकशाहीला असलेल्या धोक्याच्या मुद्यावर एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. तसेच मतविभाजन टाळणे गरजेचे असल्याचे दोन्ही पक्षांतील एकमत झालं. आघाडी करायची झाल्यास ती कशी असावी याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्राथमिक स्तरावर चाचपणी केली. पुढील निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असे अशोक चव्हाण व सुनील तटकरे यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले. राष्ट्रवादीसोबत कडवटपणा आमच्यात कधीच नव्हता. सर्व पक्षांनी भाजपविरोधात मोट बांधांवी व मतांचे विभाजन टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत यावे अशी आमची इच्छा असल्याचेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

 

काही झाले तरी लोकसभा निवडणूक एकत्र लढविण्याबाबत दोन्ही पक्षांत एकमत होत आहे. त्यामुळे आजची बैठक ही प्राथमिक स्तरावरील असली तरी यापुढे टप्प्याटप्प्याने यावर चर्चा होऊन आघाडीची घोषणा होऊ शकते जेणेकरून कार्यकर्त्यांत संभ्रम राहणार नाही. शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर वाढत चालले असताना हीच एकत्र येण्याची योग्य असल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. 

 

दरम्यान, या घडामोडीमुळे भाजपात काही प्रमाणात अस्वस्थता आहे. मागील महिन्यात शिवसेनेने लोकसभा-विधानसभा निवडणुकांसह सर्व निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतरही उद्धव ठाकरे व शिवसेनेचे नेते भाजपवर विशेषता मोदी-शहांवर हल्लाबोल करतच आहेत. त्यात गुजरातमधील काटावरील बहुमत व राजस्थानातील पोटनिवडणुकीतील धक्‍कादायक पराभवानंतर पक्षाच्या विरोधात वातावरण होऊ लागले आहे. अर्थसंकल्पातूनही देशाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील क्रूड आईलच्या संभाव्य वाढत्या किंमतीनंतर महागाई वाढण्याची भीती आदी मुद्यांबाबत भाजपात चिंतन सुरू आहे. आता सर्वत्र वातावरण योग्य व्हावे यासाठी लवकरात लवकर वातावरण बदलण्याचे भाजपकडून प्रयत्न केले जाणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यासंदर्भात कोअर कमिटीची बैठक लवकरच घेणार असल्याचे समजते.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...