आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता आर्थिकदृष्ट्या मागास उद्योजकांना बिनव्याजी कर्ज;शेती व शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबई- आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजकांसाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना अाणि शेतकरी कुशल योजना अशा ४ याेजनांचा शुभारंभ शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. शेती व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या अडीच लाख युवकांना येत्या वर्षभरात प्रशिक्षणही दिले जाईल. नंतर आणखी अडीच लाख युवकांना प्रशिक्षण दिले जाईल, अशी घाेषणा फडणवीस यांनी केली.

 

मराठा क्रांती माेर्चाच्या मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी नेमलेल्या उपसमितीने या याेजनांबाबत निर्णय घेतले हाेते. त्यानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत ४ याेजना राबवल्या जातील. महामंडळाने ‘प्रोजेक्ट ॲप्रायझल सिस्टिम’ तयार केली आहे, त्याअंतर्गत उद्याेजकांना व शेतीव्यवसायाला कर्ज देण्याचे काम बँका करतील. व्याजाचे पैसे महामंडळ भरेल. यापूर्वी छत्रपती शाहू महाराज शिक्षण प्रतिपूर्ती योजना ही ६०२ अभ्यासक्रमांना लागू केली आहे. 

 

> व्याजाचे पैसे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ भरणार

 

१. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

कृषी, संलग्न आणि पारंपरिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग (उत्पादन, व्यापार व विक्री आणि सेवा) क्षेत्रांसाठी ही याेजना आहे. कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा फायदा घेता येईल.


२. गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना

कृषी, संलग्न आणि पारंपरिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग (उत्पादन, व्यापार व विक्री आणि सेवा) क्षेत्रांसाठी ही याेजना आहे. शासनमान्य बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था आणि कंपन्या पात्र असतील. या प्रकल्पासाठी यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.


३.गट प्रकल्प कर्ज योजना

कृषी, संलग्न आणि पारंपरिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग (उत्पादन, व्यापार व विक्री आणि सेवा) क्षेत्रांसाठी ही याेजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेब पोर्टलवर नावनोंदणी करणे आवश्यक. कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा फायदा घेता येईल. हे कर्ज केवळ मुदत कर्ज असेल. पात्र ठरल्यानंतर गटांना ऑनलाइन मंजुरी दिली जाईल. बिनव्याजी कर्ज रक्कम परतावा वितरणाच्या खात्यात ७ महिन्यांपासून ८४ व्या महिन्यापर्यंत (७ वर्षे) समान हप्त्यात देणे आवश्यक अाहे.

 

४. शेतकरी कुशल योजना

शेतकरी आणि तरुणांसाठी स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरिता कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये दोन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध ३४ कृषीविषयक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये प्रकल्पाचा कालावधी १६ महिने असून जवळपास २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

 

उद्योजकांना मिळेल इतके कर्ज

> १० लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज
> ५० लाखांपर्यंत मिळेल गटकर्ज
> १० लाखांपर्यंत मिळेल गटशेती
> ०१ काेटीपर्यंत सामूहिक उद्याेग

 

> मराठा समाजातील हाेतकरू तरुणांना केवळ नाेकरी, राेजगार देण्याच्या उद्देशाने नव्हे तर पुढच्या काळात इतरांना नाेकऱ्या देणारे पाच लाख उद्याेजक बनवण्याचा सरकारचा उद्देश आहे. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

 

वार्षिक कौटंुबिक उत्पन्न ८ लाखांच्या आत असावे

या योजनांचा फायदा महाराष्ट्राचा रहिवासी, १८ ते ४१ वयापर्यंतच्या लोकांनाच. लाभार्थीचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक आवश्यक. लाभार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ८ लाख रुपयांच्या मर्यादेत असावे. दिव्यांगांना सक्षम यंत्रणेने दिलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...