आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी कर सुसंगत नाही; लवकर सुधारणा कराव्या; हायकाेर्टाची केंद्राला फटकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘वस्तू अाणि सेवा करा’चा (जीएसटी) माेदी सरकारकडून कितीही गाजावाजा हाेत असला तरी विराेधक व व्यापारी वर्गाकडून मात्र या कराला माेठ्या प्रमाणावर विराेध हाेत अाहे. साेमवारी मुंबई उच्च न्यायालयानेही जीएसटी करसुसंगत (टॅक्स फ्रेंडली) नसल्याची टिप्पणी केली अाहे. एका कंपनीच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने या करासंबंधी असलेल्या तक्रारी लवकरात लवकर दूर करण्याचे निर्देशही सरकारला दिले अाहेत.  


अबीकाेर अँड बेंजेल टेक्नाेवर्ल्ड नामक कंपनीने जीएसटीविराेधात याचिका दाखल केली अाहे. न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने म्हटले की, ‘जीएसटीचा प्रचार खूप झाला, हा कर लाेकप्रिय असल्याचेही सांगितले. मात्र त्याचा काहीच उपयाेग नाही. जर संंबंधित वेबसाइट व पाेर्टलवर सहजपणे या कराबाबत माहिती मिळत नसेल तर या गाजावाजाला काहीच अर्थ नाही.’ कंपनीचा दावा अाहे की, ‘जीएसटी नेटवर्कवर अामच्या कंपनीचा प्राेफाइल मिळत नाही, परिणामी ई-वे बिल मिळू शकत नाही. त्यामुळे अाम्हाला उत्पादित माल इतरत्र पाठवता येत नाही.’ त्यावर न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत सरकारकडून उत्तर मागितले अाहे.  ‘हा कायदा लागू करणाऱ्यांना किमान अाता तरी जाग येईल अाणि ताे अधिक साेपा करून लागू केला जाईल. देशाची प्रतिमा राखण्यासाठी हा कायदा याेग्य पद्धतीने लागू करणे अावश्यक अाहे,’ असे न्यायालयाने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...