आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील तेलाच्या टँकरने भरलेले, 22 भारतीय खलाशी असलेले जहाज पश्चिम आफ्रिकेत गायब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील अँग्लो ईस्टर्न शिपिंग कंपनीच्या मालकीचे जहाज पश्चिम आफ्रिकेच्या किनारपट्टीवर गायब झाले आहे. तेल टँकर असलेल्या या जहाजावर 22 भारतीय नागरिक आहेत. गल्फ ऑफ गिनी या ठिकाणाहून हे जहाज गायब झाले आहे. गुरुवारी सकाळी साडेपाच वाजल्यापासून या जहाजाशी कोणताही संपर्क झालेला नाही त्यामुळे या जहाजाचे अपहरण झाले असावे अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे.

 

 

मुंबईतील अँग्लो ईस्टर्न शिपिंग कंपनीने जहाजाचा शोध घेण्यासाठी शिपिंग डायरेक्टरेट जनरल यांची मदत मागितली आहे. हे एक व्यापारी जहाज आहे. या जहाजाचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

 

 

एकाच महिन्यानंतर दुसरे प्रकरण

जानेवारी महिन्यातही एमटी बँरेट नावाच्या जहाजाचे बेनिनच्या किनाऱ्यावरून अपहरण करण्यात आले होते. त्यातही अनेक भारतीय खलाशी होते. ते जहाज समुद्री चाच्यांनी पळवले होते. त्यांना खंडणी दिल्यावर ते जहाज परत सापडले होते. 

 

 

MEA ने दिली माहिती

गायब झालेले जहाज पश्चिम अफ्रिकेतील समुद्री चाच्यांनी पळवले असावे अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही शक्यता लक्षात घेऊन तपास करण्यात येत आहे.   परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे. या संदर्भात +234-9070343860 हा हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...