आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून उडी मारून एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना ही मागणी केली.
सेंट जॉर्ज रूग्णालयात या युवकाला दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान हर्षलचा मृत्यू झाला. या तरुणावर मेव्हणीच्या खूनाचा गुन्हा दाखल होता. माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वडीलांशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांनी या युवकावर खूनाचा गुन्हा दाखल झाला होता, अशी माहिती दिली आहे. तो या आरोपात दोषी ठरल्याने शिक्षा भोगत होता. तो पॅरोलवर बाहेर आला होता. तो सध्या खुल्या कारागृहात होता. तो महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण या ठिकाणी नोकरी करीत असल्याचे त्याच्या ओळखपत्रावरून समजते. हर्षल रावते असे या युवकाचे नाव असून त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठीही सापडली असून, त्यामध्ये 'माय न्यायाधीश' अशा नावाने अर्ज लिहिला आहे. तीस दिवसांच्या पॅरोलवर तो बाहेर आला होता. आज त्याच्या रजेचा शेवटचा दिवस होता. गेल्या काही काळात मंत्रालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही तिसरी घटना आहे.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.