आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Result: \'उस्मानाबाद- बीड- लातूर\'मध्ये भाजपचे सुरेश धस 76 मतांनी विजयी, धनंजय मुंडेंना धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी 80 मतांनी विजय मिळवला. - Divya Marathi
उस्मानाबाद- बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी 80 मतांनी विजय मिळवला.

उस्मानाबाद- विधान परिषदेच्या उस्मानाबाद- बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा 76 मतांनी पराभव करत प्रतिष्ठेच्या लढतीत बाजी मारली. सुरेश धस यांना 527 मते तर अशोक जगदाळे यांना 451 मते मिळाली. सांकेतिक आकडे लिहल्याने तब्बल 25 मते बाद ठरविण्यात आली आहेत. 

 

दरम्यान, अशोक जगदाळेंच्या पराभवासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसला व खासकरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का बसला आहे. या विजयामुळे पंकजा मुंडे यांनी मनोबल वाढणार असून, पक्षातही त्यांचे वजन वाढणार हे स्पष्ट आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीकडे उस्मानाबाद- बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 1005 पैकी 527 मते असूनही अशोक जगदाळे यांचा पराभव झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

 

उस्मानाबाद- बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या मतमोजणीस सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. मात्र, याबाबत निकालाचे कोणतेही अपडेट दिले जात नव्हते. केवळ 1005 मतदार असल्याने एकूण पाच टेबलावर मतमोजणी प्रत्येकी 200 अशी मतमोजणी झाली. 125 कर्मचाऱ्यांमार्फत मतमोजणीचे काम सुरू होते. 

 

उस्मानाबादेत मतमोजणीदरम्यान उमेदवार अशोक जगदाळे आणि सुरेश धस यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. बाद मतावरून दोघांमध्ये वाद झाला. निवडणूक अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करत वाद थांबवला मात्र त्यामुळे तणावाचे वातावरण झाले होते. यामुळे पत्रकारांना बाहेर काढले व दरवाजा बंद करून मतमोजणी सुरू केली. 

 

मतदानानंतर 21 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. बीडमधील 10 अपात्र नगरसेवकांसह सर्वच मतदारांची मते एकत्रित करून मोजणी करावी, असे अादेश आैरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. सुनील कोतवाल यांनी सोमवारी दिले होते. खंडपीठाने निवडणूक विभागास मतमोजणी तत्काळ घेण्यास सांगितले, त्यावर निवडणूक आयुक्तांनी अादेश दिल्यानंतर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज मतमोजणीचा निर्णय घेतला. 21 मे राेजी झालेल्या या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस व राष्ट्रवादी पुरस्कृत अशाेक जगदाळे यांच्याच चुरस होती. मात्र, सुरेश धस यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. 

 

अंतिम निकाल-


सुरेश धस - 527
 
अशोक जगदाळे- 451

 

नोटा- 1

 

बाद मते- 25

 

एकूण- 1003 मतदान.

 

भाजपचे सुरेश धस 76 मतांनी विजयी.

बातम्या आणखी आहेत...