आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश धस की अशाेक जगदाळे; ‘बीड-उस्मानाबाद-लातूर’ मध्ये मुंडे बहिण-भावाची प्रतिष्ठा पणाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद/ अाैरंगाबाद - मतदानानंतर २१ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निकाल जाहीर हाेणार अाहे. बीडमधील १० अपात्र नगरसेवकांसह सर्वच मतदारांची मते एकत्रित करून माेजणी करावी, असे अादेश आैरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. सुनील कोतवाल यांनी सोमवारी दिले. खंडपीठाने निवडणूक विभागास मतमोजणी तत्काळ घेण्यास सांगितले. त्यावर निवडणूक आयुक्तांनी अादेश दिल्यानंतर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी मतमोजणीचा निर्णय घेतला.  २१ मे राेजी झालेल्या या निवडणुकीत  भाजपचे उमेदवार सुरेश धस व राष्ट्रवादी पुरस्कृत अशाेक जगदाळे यांच्याच चुरस अाहे.
बातम्या आणखी आहेत...