आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने कारभाराचा बट्ट्याबोळ केला, अबकी बार, फुसका बार; ठाकरेंची योगींवर टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  केंद्रात आणि राज्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून भाजपचीच सत्ता आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत, परंतु यांनी कारभाराचा बट्ट्याबोळ केला. त्यामुळे आता ‘अबकी बार नाही तर फुसका बार,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. ‘स्वत:चा लोकसभा मतदारसंघ राखू शकला नाही, असा मुख्यमंत्री इथे येऊन मार्गदर्शन करतोय, आज योगींना प्रचाराला आणलेय, उत्तर प्रदेशमध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या बालकांचे शाप लागले आहेत योगींना.

 

आदित्यनाथांच्या येण्यामुळे जर प्रश्न सुटणार असतील तर आम्ही निवडणुकीतून माघार घेतो, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर देत त्यांनी ‘मोदींनी कधी तरी आमच्या देशात यावे,’ असा पंतप्रधान मोदींवर उपरोधिक टोलाही लगावला. 


शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या प्रचारासाठी वसईमध्ये आयोजित करण्यात आलेल्रूा प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, राजकारणात आरोप- प्रत्यारोप होत असतात. मात्र, तुम्ही जनतेला काय दिले हे महत्त्वाचे. मुख्यमंत्री म्हणतात, शिवसेनेने पाठीत वार केला. पण, हे बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का? त्यांनी लोकसभा निवडणुकीआधीच म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या वेळेसच गावित यांच्याशी बोलून ठेवले होते म्हणतात. मग, त्यांनी श्रीनिवास वनगा यांना हे का सांगितले नाही, असा प्रश्नही त्यांनी केला. 

 
वनगा कुटुंबाला आम्ही काही लालूच दिली नाही. तो परिवार माझ्याकडे आला आणि आम्ही त्यांचे अश्रू पाहिले, आम्ही अश्रूंची किंमत केली ...तुम्ही त्यांना काय दिले?  त्यांनी कधी स्वतःकडे पाहिले नाही, ३५- ४० वर्षे वनगा यांनी  केवळ भगवा हातात धरला, मात्र तुम्ही त्यांना, त्यांच्या परिवाराला काहीच दिले नाही. तुम्ही वनगांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराला वाऱ्यावर सोडले. आमच्या कृष्ण घोडा यांच्या मृत्यूनंतर मी  लगेच अमितला बोलावले आणि विचारले, तुम्ही तसे का नाही केले? गिरकर ताई भाजपच्या नगरसेविका होत्या, त्यांच्या निधनानंतर आम्ही त्यांच्या कुटुंबीयांना मदत केली. पतंगराव कदम यांचे निधन झाले, आम्ही विश्वजितला पाठिंबा दिला. मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडून आम्हाला शिकायची गरज नाही, असेही उद्धव म्हणाले.  

 

एका आदिवासी मुलाला पाडण्यासाठी बापजाद्यांना बोलावता  
यांच्याकडे उमेदवार नाही, माणसे नाहीत, उत्तर प्रदेशमधून माणसे आणतात, एका आदिवासी मुलाला पाडण्यासाठी तुम्ही बापजाद्यांना बोलावता, मात्र निष्ठेचा पराभव तुमची भाडोत्री माणसे करू शकत नाहीत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर प्रहार केला. आयात नेत्यांच्या जोरावर तुम्ही निवडणूक लढताय, तुम्हाला याची जाणीव लक्षात यायला हवी की तुमचा पक्ष संपत चाललाय, असेही ठाकरे या वेळी म्हणाले.

 

 पुढील स्लाईडवर वाचा, नाव शिवसेना, पण काम अफझल खानाचे : योगी 

बातम्या आणखी आहेत...