आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत पेट्रोलचे भाव गगनाला भिडले, डिझेलने ओलांडली सत्तरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या इंधन दरवाढीमुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे दिल्ली, मुंबईत पेट्रोल व डिझेलच्या दराने नवा उच्चांक गाठला. मुंबईत बुधवारी पेट्रोलचे दर लिटरमागे 82 रुपये 52 पैशे तर डिझेलचे दर लिटरमागे 70 रुपये 24 पैशांवर पोहोचले आहे. महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटकमध्ये पेट्रोल लिटरमागे 9 रुपयांनी तर डिझेल 3.50 रुपयांनी स्वस्त आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा अधिभार कमी करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. 

 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव प्रति बॅरल 80 डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. हे दर 100 डॉलर देखील होऊ शकतात अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नोव्हेंबर 2014 नंतर कच्चा तेलाच्या दराने बुधवारी उच्चांक गाठला आणि त्याचा परिणाम भारतावर झाला. अशात केंद्रीय अर्थ खाते पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यास तयार नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना इंधनासाठी खिसा रिकामा करावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...