आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी मुंबई विमानतळाचे मोदींच्या हस्ते भूमीपूजन, 2019 ला पहिले टेकऑफ- फडणवीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी... - Divya Marathi
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन आज करण्यात आले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू उपस्थित होते.

 

दरम्यान, नवी मुंबई विमानतळावरून 2019 मध्ये पहिले टेकऑफ होईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास केवळ 40 मिनिटांत करता येईल असेही फडणवीस यांनी सांगितले. नवी मुंबईतील विमानतळासह अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम पुढील वर्षातच पूर्ण करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 1160 हेक्टर जागेवर 16 हजार कोटी रूपये खर्चून नवी मुंबईतील विमानतळ उभारले जाणार आहे. 

 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा,  मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेच्या तयारीचे फोटोज व माहिती.....

बातम्या आणखी आहेत...