आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत PNB च्या शाखेत 11 हजार कोटींचा गैरव्यवहार; काही खातेदारांच्या संगनमताचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही निवडक खात्यातून हे व्यवहार झाल्याचे पंजाब नॅशनल बँकेने म्हटले आहे. (सांकेतिक फोटो) - Divya Marathi
काही निवडक खात्यातून हे व्यवहार झाल्याचे पंजाब नॅशनल बँकेने म्हटले आहे. (सांकेतिक फोटो)

मुंबई- पंजाब नॅशनल बॅंकेच्या ब्रीच कँडी शाखेत 11 हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याची माहिती बँकेने पत्र लिहून मुंबई स्टॉक एक्स्चेंजला दिली आहे. काही खातेदारांच्या संगनमताने 1.77 बिलियन डॉलर म्हणजे अंदाजे 11 हजार 357 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय झाल्याचे पंजाब नॅशनल बँकेचे म्हणणे आहे. काही अनधिकृत आणि संशयास्पद व्यवहार झाल्याचे बँक प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर ही माहिती देण्यात आली.

 


इतर बॅंकांकडूनही या ठराविक व्यक्तींच्या खात्यामध्ये परदेशात पैसा पाठवला. हा प्रकार उघड होताच 'पीएनबी'ने याची रितसर तक्रार केली. त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण व्हायला सुरुवात झाली. दोषींना शिक्षा देण्यात येईल, असा विश्वास पंजाब नॅशनल बँकेने व्यक्त केला आहे. स्वच्छ आणि पारदर्शी कारभारासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही पंजाब नॅशनल बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...