आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाश मेहतांचे रायगड पालकमंत्रिपद काढले; राज्यमंत्री चव्हाण यांची वर्णी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जाणारे  व राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना मुख्यमंत्र्यांनी बुधवारी जोरदार धक्का दिला. रायगड पालकमंत्री पदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी डोंबिवलेचे भाजप आमदार व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची वर्णी लावली आहे.  


गृहनिर्माण प्रकल्पांसाठीच्या भूखंडांवरून मेहता अडचणीत अालेले अाहेत. मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून त्यांनी या जागेबाबत निर्णय घेतल्याचा अाराेप अाहे, तशी कबुली मेहतांनीही विधानसभेत दिली होती. तसेच म्हाडाचा भूखंड एका बिल्डरला दिल्याबाबत मेहता यांच्यावर अनियमिततेचे आरोप झाले होते.  रायगड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये मेहता यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती.   या नाराजीमुळेच मेहता यांना पालकमंत्रिपदावरून हटवण्यात आले असल्याची चर्चा आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...