आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Valentine Special: अशी आहे पूनम महाजन यांची लव्हस्टोरी, पित्याने धरला होता अबोला!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूनम भाजपचे बडे नेता राहिलेले दिवंगत प्रमोद महाजन यांची कन्या आहे. - Divya Marathi
पूनम भाजपचे बडे नेता राहिलेले दिवंगत प्रमोद महाजन यांची कन्या आहे.

मुंबई- सध्या व्हॅलेटाईन वीक साजरा होत आहे. यानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार पूनम महाजन यांच्या लव्हस्टोरीबाबत आपण माहिती घेणार आहोत. पूनम या भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या आहेत. सध्या मुंबई उत्तर-मध्य भागातील भाजपच्या खासदार आहेत. मूळच्या वैमानिक असलेल्या पूनम यांनी पंतप्रधान मोदी यांना जूहू एयरपोर्टला जेआरडी टाटा यांचे नाव देण्याची मागणी केली होती. कारण पूनम स्वत: ट्रेंड पायलट आहे. पूनम यांनी पायलटचे ट्रेनिंग अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डल्लास येथे घेतले आहे. याच काळात त्यांना त्यांचे पहिले प्रेम मिळाले आणि पुढे त्यांनी लव्हमॅरेज केले. अशी आहे लव्हस्टोरी....

 

- पूनम महाजन यांनी आनंद राव वजेंल्डा या हैदराबाद बेसड् उद्योगपतीशी विवाह केला.
- सांगितले जाते की, पूनम आणि आनंद राव यांच्यात प्रेम मुंबईत झाले पण ते फुलले लंडन व टेक्सासमध्ये.
- पूनम टेक्सासमध्ये भाऊ राहुलसह पायलटचे ट्रेनिंग घेत होत्या. त्यावेळी आनंद राव आणि पूनम अधिक जवळ आले.
- पुढे टेक्सासमधील पायलटचे ट्रेनिंग संपताच पूनम काही काळ लंडनमध्ये राहत होत्या. त्या काळात त्यांनी आनंद राव यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
- मात्र, भाजपचे बडे नेते असलेल्या प्रमोद महाजन यांचा या लग्नाला विरोध होता.

 

इंटरकास्ट व इंटरस्टेटमुळे पित्याचा होता विरोध-


- राव हे आंध्र प्रदेशातील तेलगू भाषक होते व इंटरकास्ट व इंटरस्टेट लग्न पिता प्रमोद महाजन यांना मंजूर नव्हते. 
- याचे कारण महाजन परिवाराच्या तुलनेत राव कुटुंब प्रतिष्ठित व श्रीमंतही नव्हते. आनंद राव यांचे वडिल व्ही व्ही राव हे मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख होते.
- वडिल प्रमोद महाजन यांनी समजावूनही पूनम लग्नावर ठाम होत्या.
- पूनम यांच्या ठाम निर्णयाला आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते प्रमोद महाजन यांनी एका मर्यादेच्या पुढे विरोध केला नाही.

 

लग्नानंतर पित्याने धरला अबोला-


- अखेर पित्याचा विरोध असूनही पूनम महाजन आणि आनंद राव यांनी लग्न केले. मात्र, त्यानंतर प्रमोद यांनी कन्या पूनमशी अबोला धरला.
- मात्र, पुढे लवकरच पूनम यांना आद्य नावाचा मुलगा झाला. यानंतर प्रमोद महाजन यांचा अबोला कुठल्या कुठे पळून गेला. आपल्या नातवाला भेटायला गेल्यावर त्यांनी मायक्रोफन भेट दिला. त्यानंतर दोन्ही कुटुंबांत सर्वकाही आलबेल झाले. 
- या पूनम व आनंद या जोडप्याला मुलगा आद्य व मुलगी अविका अशी दोन गोड मुले आहेत. 
- पूनम आता राजकारणात स्थिर झाल्या आहेत तर पती लंडन, हैदराबादसह मुंबईतून आपल्या व्यवसाय सांभाळतात. 
- मात्र, आनंद राव हे आपल्या कामात पूर्णवेळ बिझी असतात. पत्नी पूनम किंवा महाजन- मुंडे परिवारासमवेत सार्वजनिकरित्या ते फारसे दिसत नाहीत.

 

लायसन्सधारी पायलट आहे पूनम-

 

- 9 डिसेंबर 1980 रोजी प्रमोद महाजन आणि रेखा महाजन यांच्या घरात जन्मलेली पूनम यांचे उच्चशिक्षण अमेरिका आणि लंडनमध्ये झाले आहे.
- पूनम यांनी ब्रायटन स्कूल ऑफ बिजनेस अॅंड मॅनेजमेंटमधून बीटेकची डिग्री फेब्रुवारी 2012 मध्ये पूर्ण केली. 
- याशिवाय पूनम यांनी टेक्सास, यूएसमधील एयर मिस्ट्रल फ्लाईंग स्कूलमधून पायलट लायसन्स मिळवले. यासाठी पूनम यांना 300 तास फ्लाईंग करायला लागले होते.

 

पित्याच्या हत्येनंतर उतरावे लागले राजकारणात-

 

- पूनम यांना खरं तर राजकारणात यायचं नव्हतं. मात्र, 2006 मधील एका घटनेनं त्यांचे कुटुंब उद्धवस्त झाले.
- पिता प्रमोद महाजन यांना सख्ख्या भावाने गोळ्या घालून मारले. एवढ्या मोठ्या नेत्याचा असा दुर्देवी मृत्यू झाल्याने महाराष्ट्रासह देश हळहळला होता.
- पुढे पूनम यांनी आपल्या पित्याने पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला.
- 2009 मध्ये पूनम घाटकोपर वेस्टमधून विधानसभा निवडणूक लढल्या. मात्र त्यावेळी त्या पराभूत झाल्या.
- 2014 मध्ये भाजपने त्यांना मुंबई नॉर्थ सेंट्रल लोकसभा मतदारसंघातून उतरवले. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रिया दत्त यांना मोठ्या मताधिक्क्याने पराभूत केले होते.
- डिसेंबर 2016 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून त्याची निवड करून पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, पूनम महाजन यांचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...