आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त प्रिती झिंटाच नव्हे, या महिलांसोबतच जोडले गेलेय नेस वाडियाचे नाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिती झिंटाने नेस वाडियावर मारहाण आणि छेडछाडीचा आरोप केला होता. - Divya Marathi
प्रिती झिंटाने नेस वाडियावर मारहाण आणि छेडछाडीचा आरोप केला होता.

मुंबई- बॉलिवूड अॅक्ट्रेस प्रिती झिंटासोबत छेडछाड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बिजनेसमॅन नेस वाडियाविरोधात 200 पानी चार्जशीट फाईल केली आहे. नेस वाडिया या प्रकरणी 20, 000 रुपयांच्या जामिनावर आहे. आपल्या माहितीसाठी हे की, हे प्रकरण 2014 मधील आहे. प्रिती झिंटासोबत ही छेडछाडीची घटना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मॅच दरम्यान 30 मे 2014 रोजी वानखेडे स्टेडियमवर झाली होती. बिजनेसमॅन आणि IPL टीम किंग्स -XI पंजाबचा को-ओनर नेस वाडिया आपल्या अफेयर्समुळे नेहमीच चर्चेत असतो. वाडिया आणि प्रिती झिंटासह अनेक सेलेब्रिटीजला डेट केले आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याच्याशी संबंधित महिला आणि अफेयर्सबाबत.....

 

काय आहे प्रकरण-

 

- 2014 साली मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर केकेआर आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्या दरम्यानच्या सामन्यावेळी प्रिती आणि नेस वाडिया यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
- वाद एवढा विकोपाला गेला की, दोघांनी एकमेकांवर हात टाकला. प्रितीचा आरोप आहे, की वाडियाने तिच्यासोबत गैरवर्तन केले. 
- प्रिती आयपीएलमधील क्रिकेट संघ किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकीन आहे, तर वाडिया देखील या संघाचा सहमालक आहे.

 

ब्रेकअपनंतर प्रीतीने दिली होती तक्रार-

 

- पाकिस्‍तानचे संस्‍थापक मोहम्‍मद अली जिना यांचे पणतू आणि वंशज नेस वाडिया हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. 
- जिना यांची मुलगी दिना आणि जवाई नेवील वाडिया यांचे नेस हे नातू आहेत. नेस वाडिया हे प्रीती झिंटाचे प्रियकर होते. 
- प्रीतीने त्‍यांच्‍या विरुद्ध दिलेल्‍या विनयभंगाच्‍या तक्रारीनंतर ते विशेष चर्चेत आले. प्रीती झिंटा व उद्योगपती नेस वाडिया या दोघांचे अफयर सुरू होते. 
- परंतु, अचानक प्रीतीने नेस यांच्याविरुद्ध अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याची तक्रार दिली. त्‍यामुळे या दोघांचे ब्रेकअप होऊन सिनेसृष्टीसह उद्योगजगतात प्रचंड खळबळ उडाली होती.

 

नेस द्यायचा प्रीतीला सिगारेटचे चटके-

 

- प्रीती झिंटाने उद्योगपती नेस वाडियावर आणखी एक आरोप केला होता. ती म्‍हणाली होती की, ' वानखेडे स्टेडियमवर झालेल्या छेडछाडीच्या घटनेअगोदर सिगरेटचे चटके देत असे.' 
- यासंदर्भात प्रीतीने तत्‍कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना पत्राद्वारे ही माहिती दिली होती. 
- यात तिने म्हटले होते की, 'गेल्या काही दिवसांपासून नेसचे वागणे खूपच आक्रमक आणि हिंसक होत होते. माझ्या चेह-यावर जळती सिगारेट फेकणे, मला खोलीत डांबणे याबरोबरच माझ्याबरोबर हुज्जत घालणे असे बरेच काही मी सहन केले आहे.'
- सोबतच परदेशात जाण्यासाठी परवानगी घेण्यासाठी प्रिती मारिया यांना भेटली होती. 'मला शांतीने जगता याने म्हणून त्याने माझ्यापासून दूर राहावे. नसता एखाद्या दिवशी रागात तो माझा जीव घेईल अशी भीती मला वाटते', असेही प्रितीने आपल्या पत्रकात लिहिले होते.

 

कोण आहे नेस वाडिया-

 

- नेस यांचे वडील नुस्ली वाडिया हे अरबपती असून, ते वाडिया ग्रुप्स कंपनीचे मालिक आहेत. 
- त्‍यांची आई मॉरीन वाडिया या एका फॅशन मॅगजीन गलॅडरॅग्सच्‍या मालकीन आहेत. त्‍यांनी मॅनहंट कॉंन्टेस्ट आणि ग्लॅडरॅग्स मेगा मॉडलसारख्‍या स्‍पर्धांची सुरुवात केली.
- वाडिया ग्रुपच्‍या अनेक कंपन्‍या आहेत. त्‍यातील ब्रिटानिया इंडस्ट्री हीसुद्धा एक आहे. नेस या कंपनीचे डायरेक्टर आहेत. 
- ब्रिटानिया ही एक भारतीय कंपनी असून, ती बिस्‍कीट, रस्क, ब्रेड, केक्स, आणि डेयरी प्रोडक्ट्स बनवते आणि विकले. 
- या शिवाय या ग्रुपमध्‍ये बॉम्बे डाइंग ही कंपनीसुद्धा आहे. ती कापडासाठी प्रसिद्ध आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, नस वाडियाच्या आयुष्यात कोणत्या कोणत्या महिला आल्या...

बातम्या आणखी आहेत...