आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजी शाळांमध्ये मराठीला प्राधान्य द्या : शायना एनसी यांची राज्यपालांकडे मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मातृभाषा असूनही इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषेची गळचेपी हाेत अाहे. खासगी शाळांत महाराष्ट्राची प्रादेशिक भाषा शिकवली जात नाही ही परिस्थिती नवीन पिढीच्या दृष्टीने घातक अाहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठी तसेच हिंदी भाषेला प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी शायना एनसी यांनी केली अाहे. या संदर्भात त्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव अाणि शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांना पत्र लिहिले अाहे.  


त्या म्हणाल्या,  पहिली ते अाठवी इयत्तेपर्यंत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक असतानाही मुंबईत खासगी इंग्रजी शाळांत ती शिकवली जात नाही. मराठीच्या तासाला याेगा किंवा पीटीसारखे तास घेतले जात असल्याचे दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...