आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदीने माझे पण कोट्यावधी रूपये बुडवले- प्रियांका चोप्राची कोर्टात धाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीरव मोदीने 2010 साली आपल्या ब्रॅंडची स्टोअरची चेन जगभर सुरू केली होती. यासाठी प्रियांका चोप्राला त्याने ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणून निवडले होते. - Divya Marathi
नीरव मोदीने 2010 साली आपल्या ब्रॅंडची स्टोअरची चेन जगभर सुरू केली होती. यासाठी प्रियांका चोप्राला त्याने ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणून निवडले होते.

मुंबई- पंजाब नॅशनल बॅंकेला तब्बल 11 हजार 400 कोटी रूपयांचा चुना लावणा-या नीरव मोदीने आपलेही कोट्यावधी रूपये बुडविले असल्याचा आरोप बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने केला आहे. प्रियांका हा आरोप करून थांबली नाही तर तिने नीरवविरोधात कोर्टात धाव खटला दाखल केला आहे. नीरवचे पंजाब नॅशनल बॅंकेच्या घोटाळ्यात नाव येताच प्रियांकाने हे पाऊल उचलले आहे.

 

प्रियांका चोप्रा ही नीरव मोदीच्या 'नीरव मोदी डायमंड्स' या ब्रॅंडची ब्रॅंड अॅम्बेसिडर आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत प्रियांकाने मोदींच्या या ब्रॅंडसाठी अनेक जाहिराती शूट केल्या आहेत. मात्र, या जाहिरातीच्या मानधनाबाबत जे करार झाले होते त्यानुसार नीरव मोदीने आपल्याला पैसे दिले नसल्याचे प्रियांकाने म्हटले आहे. तसेच पंजाब नॅशनल बॅंकेच्या घोटाळ्यात मोदीचे नाव येताच त्याच्याविरोधात खटला दाखल केला आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा सुद्धा नीरव मोदीसोबतचे सर्व संबंध तोडणार आहे.
 
नीरव मोदीने 2010 साली आपल्या ब्रॅंडची स्टोअरची चेन जगभर सुरू केली होती. यात दिल्ली, मुंबईसह लंडन, न्यूयॉर्क, लास वेगास, सिंगापूर, हवाई, मकाऊ, बीजिंग आदी शहरांसह जगभरातील 16 शहरांत त्याने बिजनेस थाटला आहे. यासाठी प्रियांका चोप्राला त्याने ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणून निवडले होते. 

 

पंजाब नॅशनल बॅंकेची 177.17 कोटी डॉलर म्हणजेच 11, 356 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. बॅंकेने या प्रकरणात हिरे व्यापारी नीरव मोदीविरोधात सीबीआयकडे दोन तक्रारी दाखल केल्या आहेत. देशातील डायमंड किंग म्हणून ओळख असलेल्या नीरवची फोर्ब्सच्या श्रीमंत यादीत स्थान पटकावले होते. 48 वर्षीय नीरव मोदी बेल्जियममधील शहर ऐंटवर्पमध्ये हि-याचा व्यापार करणा-या परिवारातून येतो. नीरवने वॉर्टनमधून फायनान्समधून एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला मात्र तेथे तो फेल झाला. त्यामुळे त्याला हि-यांच्या व्यापारात उतरावे लागले. त्याचे कुटुंबिय सुरूवातीपासूनच हिरे व्यवसायात होते.

 

1999 मध्ये त्याने 'फायर स्टार डायमंड' नावाची कंपनी सुरू केली. तसेच नंतरच्या काळात त्याने काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे अधिग्रहण केले. यानंतर त्याने आपले नेटवर्क विदेशांत पसरविण्याचा निर्णय घेतला. तसेच कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चुरिंग फील्डमध्ये पाऊल ठेवले. भारताशिवाय नीरवचा रशिया, आर्मेनिया आणि दक्षिण अफ्रिकेत मॅन्युफॅक्चुरिंग यूनिट्स आहेत.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...