आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: आईकडे सतत पाहतो म्हणून 35 वर्षीय व्यक्तीची मुलाकडून हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- घराजवळ राहणारा इसम आर्इ भांडी घासत असताना, तिच्याकडे पाहताे याकारणावरुन मुलाने संबंधित इसमाशी भांडणे केली. त्यानंतर घरमालकाने खाेली खाली करण्यास लावल्याचा राग मनात धरुन, मुलाने साथीदारांच्या मदतीने अजय शिवपुरण उर्फ जयराम सहाणी (वय- 35, रा. जांभे, ता. मुळशी, पुणे) या व्यक्तीचा हत्या केल्याची घटना घडली अाहे. याप्रकरणी हिंजवडी पाेलीसांनी तीन अाराेपींना अटक केली अाहे. 

 

करण राजु गायकवाड (वय- 23, रा. नांदेड), अमाेल बबन धिंडे (19, रा. जालना) व मारुती ऊर्फ बापु रघुनाथ पवार (27, रा. नाशिक) अशी याप्रकरणी अटक करण्यात अालेल्या अाराेपींची नावे अाहेत. याप्रकरणी पोलिसांकडे जयराम याची पत्नी बिंदु सहाणी (32) हिने फिर्याद दिली अाहे. 

 

याबाबतची माहिती अशी की, बिंदु सहाणी या नेरे फाटा, जांभे येथे माळीकाम करतात तर त्यांचा पती जयराम हा पुनावळे येथे एका कंपनीत सफार्इ सेवक म्हणून नाेकरीस हाेता. सुमारे तीन महिन्यांपुर्वी त्यांचे चाळीत राहणारा करण गायकवाड याने जयराम कामावरुन अाल्यावर बाहेर बसून, त्याची अार्इ भांडी घासत असताना तिच्याकडे पाहतो या कारणावरुन त्यांच्याशी भांडणे केली हाेती. याकारणावरुन त्यांच्यात वारंवार भांडणे झाल्याने करण गायकवाड यास घरमालकाने खोली करण्यास लावली हाेती. 


या कारणावरुन जयराम साहनी हा कामावरुन साेमवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास येत असताना, अाराेपी गायकवाड याने दाेन साथीदारांच्या मदतीने जयराम यास लाथा-बुक्क्यानी जबर मारहाण करुन, जखमी करुन त्यास जिवे ठार मारले. हिंजवडी पाेलीस ठाण्याचे सहाय्यक पाेलीस निरीक्षक एम.पी.साेनवणे याबाबत पुढील तपास करीत आहे. 

बातम्या आणखी आहेत...