आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाब नॅशनल बॅंकेत 11 हजार 400 कोटींचा घोटाळा, सूत्रधार मोदीचे विदेशात पलायन, ईडीचे छापे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीरव मोदी विदेशात फरार झाल्याचे कळताच \'ईडी\'ने आज मुंबई, सुरतसह दिल्लीतील ऑफिसवर छापे टाकले. - Divya Marathi
नीरव मोदी विदेशात फरार झाल्याचे कळताच \'ईडी\'ने आज मुंबई, सुरतसह दिल्लीतील ऑफिसवर छापे टाकले.

मुंबई- पंजाब नॅशनल बँकेत देशाच्या बँकिंग क्षेत्रातील दुसरा सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. मुंबईतील ब्रेडी हाऊस शाखेतील ही फसवणूक १७७.१७ कोटी डॉलर म्हणजे तब्बल ११,३५६ कोटी रुपयांची आहे. या प्रकरणात हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याविरुद्ध सीबीआयकडे दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. बँकेच्या तक्रारीवरून ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. पीएनबीने बुधवारी स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले अाहे की, बँकेच्या या शाखेतील काही खात्यांत चुकीचे व्यवहार समोर आले. त्याच्या आधारे इतर बँकांनी खातेदारांना परदेशात कर्जे दिली अाहेत. दरम्यान, तक्रारी दाखल होताच नीरव मोदी परदेशात पळून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर मोदींच्या देशभरातील विविध कार्यालवर ईडीने छापे टाकले आहेत.

 

अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, हा गैरव्यवहार २०११ पासून सुरू होता. त्यात डीएजीएम स्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. बँकेने १० कर्मचारी निलंबित केले आहे. मंत्रालयाने प्रकरणातील सर्व बँकांकडून ३ दिवसांत अहवाल मागवला आहे. याआधी २०१५ मध्ये बँक ऑफ बडोदाच्या दिल्लीतील एका शाखेत ६ हजार कोटींचा घोटाळा समोर आला होता. 

 

सूत्रांनुसार, नीरव मोदी व संबंधित कंपन्यांसाठी ५ लेटर ऑफ अंडरस्टँडिंग अलाहाबाद बँक आणि ३ एलओयू अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँग शाखेच्या नावाने जारी झाले होते. अशा प्रकरणांत अंतिम देणी एलओयू देणाऱ्या बँकेची असते. 

 

वार्षिक नफ्याच्या ८ पट मोठा घोटाळा-

 

- घोटाळ्याची रक्कम २०१६-१७ मध्ये बँकेच्या १,३२५ कोटी नफ्याच्या तुलनेत ८ पट जास्त आहे. 
- ती बँकेच्या ३५,३६५ कोटींच्या मार्केट कॅपची एक तृतीयांश आणि ४.५ लाख कोटींच्या एकूण कर्जाची २.५% भरते. 

 

 

काय आहे हा घोटाळा आणि कसा केला?

 

- पंजाब नॅशनल बॅंकेच्या दक्षिण मुंबईतील शाखेच्या खातेधारकांमार्फत आणि काही कर्मचारी/ अधिका-यांच्या संगनमताने ११ हजार ४०० कोटींचा गैरव्यवहार केल्याची तक्रार खुद्द आता बॅंकेनेच दिली आहे. 
- मेसर्स डायमंड्‌स आर यूएस, मेसर्स सोलार एक्‍सपोर्ट, मेसर्स स्टेलर डायमंड्‌स या कंपन्यांनी परदेशातील देणी चुकती करण्यासाठी जानेवारीमध्ये 'पीएनबी'ला 'बायर्स क्रेडिट'साठी विनंती केली.
- आयातदारांच्या बॅंकांनी दिलेल्या 'लेटर ऑफ कम्फर्ट'च्या आधारावर आयातदारांना अर्थपुरवठा केला जातो. 
- या गैरव्यवहारात 'पीएनबी'च्या दोन अधिकाऱ्यांनी नियमबाह्यपणे आठ हमीपत्रे (लेटर ऑफ अंडरटेकिंग) इश्‍यू केली.
- अलाहाबाद बॅंकेच्या हॉंगकॉंगमधील शाखेसाठी पाच हमीपत्रे आणि ऍक्‍सिस बॅंकेच्या हॉंगकॉंग शाखेसाठी तीन हमीपत्रे इश्‍यू करण्यात आली. 
- नीरव मोदी, निशाल मोदी, ऍमी मोदी आणि मेहुल चोक्‍सी हे या कंपन्यांचे भागीदार आहेत.

- बॅंकेच्या तक्रारीनुसार सीबीआयने नीरव मोदी, निशाल मोदी, अमी मोदी, मेहुल चोक्‍सी, बॅंकेचे तत्कालीन उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी, एसडब्ल्यूओ मनोज खरात तसेच एक अनोळखी व्यक्ती अशा सात जणांवर गुन्हा नोंदवला. या प्रकरणी 'पीएनबी'ने 10 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. 

 

बॅंकेचे शेयर पडले, अजून परिणाम काय?

 

- दरम्यान, पंजाब नॅशनल बॅंकेत ११ हजार ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचे कळता बॅंकिंग क्षेत्रात खळबळ माजली आहे.
- आज सकाळी शेयर बाजार उघडताच पंजाब नॅशनल बॅंकेचे शेयर तब्बल १५ टक्क्यांनी ढासळले. गुंतवणूकदारांचे सुमारे चार हजार कोटींचे नुकसान झाले आहे.
- पंजाब नॅशनल बॅंकेच्या घोटाळ्यामुळे सार्वजनिक बॅंकांची पत ढासळून विश्वासर्हता धोक्यात आलीय
- सोबत खातेदारांच्या विश्वासाला तडा गेलाच आहे पण करदात्यांच्या पैशांविषयी सार्वजनिक बेफिकिरी असल्याची भावना वाढीस लागणार आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, कोण आहे या घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदी....