आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींच्या पणजोबांचे पटत नव्हते त्यांच्या आजोबांशी, आजीसोबतही ते करायचे भांडण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी यांचे आजोबा फिरोज गांधी आणि त्यांचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू. - Divya Marathi
राहुल गांधी यांचे आजोबा फिरोज गांधी आणि त्यांचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू.

मुंबई- राहुल गांधी यांची सोमवारी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. राहुल गांधी यांच्याशिवाय या निवडणुकीसाठी कोणीही अधिकृतरित्या अर्ज भरला नव्हता. यानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांचे आजोबा फिरोज गांधी यांच्याविषयी माहिती देणार आहेत. फिरोज गांधी यांच्यावर स्वीडनचे पत्रकार आणि लेखक बर्टिल फॉक लिहिलेल्या ‘द फॉर्गोटन गांधी’ या पुस्तकानुसार नेहरू हे सुध्दा फिरोज गांधी यांना घाबरत होते. पुस्तकात लिहिण्यात आले की, इंदिरा आणि फिरोज गांधी यांच्या अनेक वेळा मतभेद झाले होते.

 

मुंबईत झाला होता फिरोज गांधींचा जन्म
- फिरोज गांधी यांचे वडील फरिदून जहांगीर आणि आई रती मई मुंबईतील खेतवाडी भागातील नौरोजी नाटकवाला भवन येथे राहत होते.

- त्यांचे वडील जहांगीर किल्लीक निक्सने येथे मरीन इंजिनिअर होते. काही वर्षांनी त्यांना वारंट इंजिनिअर म्हणुन पदोन्नती मिळाली.   

 

- फिरोज आपल्या आई-वडिलांचे सगळ्यात धाकटे पुत्र होते. त्यांचे 2 भाऊ दोरब आणि फरिदून जहांगीर हे होते. त्यांना तहमीना केर्शष्प आणि अलू दस्तूर या 2 बहिणी होत्या.
- मुंबईत आजही त्यांच्या आजोबांचे घर आहे. 1920 मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर फिरोज आणि त्यांची आई त्यांच्या अविवाहित चुलतीकडे राहण्यासाठी अलाहाबाद येथे गेले.
- फिरोज गांधी यांची चुलती लेडी डफरिन हॉस्पिटलमध्ये सर्जन होती. फिरोज यांनी विद्या मंदिर हॉस्पीटलमध्ये शिक्षण घेतले. इविंग ख्रिश्चन कॉलेजमधुन त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले.
 
फिरोज गांधींना घाबरत होते नेहरु
- पुस्तकात पंडित नेहरु हे फिरोज गांधी घाबरत असल्याचे म्हटले आहे. मोरारजी देसाई यांनी आपल्या आत्मकथेत ‘द स्टोरी ऑफ माई लाइफ वोल्यूम-II’ मध्ये 2 ते 3 असे प्रसंग आल्याचे म्हटले आहे. त्याला कारण नेहरुंना आपले जावई नाराज होऊ नयेत याची चिंता वाटत होती.
- नेहरु आणि फिरोज गांधी यांच्यात अनेक मुद्दयांवर मतभेद होते. फिरोज गांधी हे सत्तेपेक्षा जास्त महत्व व्यक्तीस्वातंत्र्याला देत होते.
- फिरोज यांनी आपल्या सासऱ्यांविरोधात बंड केले होते. त्यामुळे मूंदडा-एलआयसी घोटाळ्यात नाव आल्यावर नेहरुंना टी. टी. कृष्णमाचारी यांना हटवावे लागले. 
- लेखक बर्टिल फॉक यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना काँग्रेस पक्षात पाहिजे तितके महत्व मिळाले नाही. त्याला इंदिरा गांधीच जबाबदार होत्या. त्यांनी फिरोज गांधींना नेहमीच मागे ठेवले.
 
इंदिरा आणि फिरोज गांधींमध्ये होत होती भांडणे
- इंदिरा आणि फिरोज गांधींमध्ये अनेकदा भांडणे होत. लेखक बर्टिल फॉक यांच्या मतानुसार ही भांडणे मुलांच्या संगोपनावरुन असत. बी. एन. पांडे आणि लाल बहादुर शास्त्री यांनीही याचा उल्लेख केला आहे.
-फिरोज यांच्या मृत्यूनंतर खुद्द इंदिरा गांधींनी मोहम्मद युनूस यांना पत्र लिहून म्हटले होते की, युनूस तुम्हाला माहित आहे की, माझे आणि फिरोज यांचे अनेकदा भांडण होत होते. या प्रकारची चर्चा बी. एन. पांडे यांच्यासमोर होत होती.

पुस्तकासाठी 40 वर्षांचे संशोधन
- लेखक बर्टिल फॉक यांनी या पुस्तकासाठी 40 वर्षे संशोधन केले. त्यांनी गांधी परिवारातील सद्स्यांची अशी माहिती गोळा केली जी फारशी चर्चेत नव्हती.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...