Home »Maharashtra »Mumbai» Raj Thackeray On Modi-Shah Over His Proindustrialist Babus Back Door Entry

राज ठाकरेंचा मोदी-शहांवर पुन्हा हल्लोबल, 'आमरसा'वरून संभाजी भिडेंची घेतली फिरकी

दिव्यमराठी वेब टीम | Jun 13, 2018, 18:11 PM IST

  • राज ठाकरेंचा मोदी-शहांवर पुन्हा हल्लोबल, 'आमरसा'वरून संभाजी भिडेंची घेतली फिरकी

मुंबई-राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर व्यगंचित्राच्या माध्यमातून पुन्हा हल्लाबोल केला आहे.

नरेंद्र मोदी सरकारने नुकताच थेट कार्पोरेट क्षेत्रातील बड्या नोकरदारांना थेट सहसचिव (IAS अधिकारी) होता होईल असा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत सूचना, हरकती मागवल्या आहेत. मात्र, जे हुशार विद्यार्थी अभ्यास करून, मेहनत करून स्पर्धा परीक्षा होतात त्यांच्यावर अन्याय होणार आहे. मात्र, राज ठाकरेंनी यावर नेमकं बोट ठेवलं आहे. मोदी सरकारचा हा निर्णय उद्योगपतींसाठी घेतला असून, मागच्या दाराने उद्योगपती धार्जिणे बाहेरील क्षेत्रातील लोक (कार्पोरेट) सरकारमध्ये घुसविण्याचा हा प्रयत्न असल्याचे राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून दाखवले आहे.

मोदी-शहांच्या पाठीमागे उद्योगपती लपल्याचे दाखवले आहे तर अशा लोकांचे स्वागत करण्यासाठी मोदी- शहा उतावीळ झाल्याचे दाखवले आहे तर दुसरीकडे, स्पर्धा परीक्षा सदेऊन उत्तीर्ण झालेले IAS अधिका-यांच्या उरावर हे बाहेरील लोक बसल्याचे दाखवले आहे.

भिडेंच्या 'आमरसा'वरही हल्लाबोल-

माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने 150 हून अधिक जोडप्यांना अपत्यप्राप्ती खासकरून पुत्रप्राप्ती झाली आहे, असा अजब दावा करणा-या संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या व्यंगचित्रात दोन महिला दाखवल्या आहेत. त्यातील एका महिलेच्या हातात बाळ असल्याचे दाखवलं आहे. या बाळाचा चेहरा दाखविण्याऐवजी राज यांनी तेथे आंबा दाखवला आहे. या बाळाला पाहून दुसरी महिला 'अय्या! भिडेंच्या बागेतून वाटतं,' अशा पुणेरी भाषेतील टोमणा मारत असल्याचं दाखवलं आहे.

Next Article

Recommended