आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी नाकारले चांदीचे सिंहासन; पुण्यातल्या कार्यकर्तीने अाणली हाेती भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नेत्यांवरील प्रेमापोटी कार्यकर्ते काय करतील याचा नेम नाही. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासाठी पुण्यातील मनसे कार्यकर्तीने चक्क चांदीचे सिंहासन बनवून अाणले हाेते. ही कार्यकर्ती राज यांना सिंहासन देण्यासाठी शनिवारी मुंबईत धडकली. मात्र राज यांनी सदर सिंहासन स्वीकारण्यास नकार दिला. कार्यकर्तीचा हिरमोड होऊ नये यासाठी राज यांनी ‘पुढचा मुख्यमंत्री मनसेचा होणार’ असे पत्र लिहून त्याखाली सही करून कार्यकर्तीस खुश केले.  


पुण्याच्या कार्यकर्त्या सीमा विधाते यांनी राज ठाकरेंना चांदीच्या सिंहासनाची भेट आणली होती. त्यासाठी त्यांनी ते सिंहासन शनिवारी राज यांचे शिवाजी पार्कातल्या निवासस्थानी कृष्णकुंजवरही आणले होते. या सिंहासनाची किंमत जवळपास १८ लाख रुपये आहे. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ते सिंहासन स्वीकारण्यास नकार दिला. विशेष म्हणजे राज यांना या सिंहासनाच्या भेटीसंदर्भात काहीही माहिती नव्हती.  


दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे राज यांनाही सिंहासन शोभून दिसेल म्हणून आपण चांदीचे सिंहासन बनवून आणले होते, असे सीमा विधाते यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. बाळासाहेब यांनाही एका कार्यकर्त्याने असेच चांदीचे सिंहासन भेट दिले होते. त्यावरून बाळासाहेबांवर मोठी टीका झाली होती. त्यानंतर बाळासाहेबांनी ते सिंहासन परत दिले होते. त्यानंतर ते लाकडी सिंहासन वापरत होते. भूतकाळातील हा सिंहासन वाद राज यांना माहिती असल्याने त्यांनी चांदीचे सिंहासन स्वीकारण्याचे टाळल्याची चर्चा अाहे.

बातम्या आणखी आहेत...