आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या कुंचल्यातुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आपल्या नव्या व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी हा निशाणा साधला आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला लोकसभेत उत्तर देताना 7 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, "इतिहासात काय घडले ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा काँग्रेस कमेटीची निवडणूक झाली होती त्यावेली 12 पैकी 9 सदस्यांनी सरदार पटेल यांची निवड केली होती. तर 3 जणांनी नोटाला पसंती दिली होती. देशाचे पहिले पंतप्रधान जर सरदार वल्लभभाई पटेल असते तर काश्मीरचा एक हिस्सा पाकिस्तानकडे गेलाच नसता. संपूर्ण काश्मीर हा भारतातच राहिला असता." मोदींच्या या वक्तव्याला उत्तर म्हणून राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढले आहे आणि त्यातून मोदींवर निशाणा साधला आहे.
गांधीजी 'भारताचा इतिहास' नामक पुस्तक घेऊन बसले आहेत आणि त्यांच्या मागे वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरु बसले आहेत, तर पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह बसले आहेत, असे राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्रात दिसते आहे.
या व्यंगचित्रात गांधी मोदींना उद्देशून म्हणतात, "अरे बेटा नरेंद्र, तुला दोन गोष्टी सांगायच्या आहेत! जवाहरलालना पंतप्रधान मी केले! काँग्रेसने नाही! यावर काही बोलायचंय? आणि दुसरे म्हणजे वल्लभभाई जरी देशाचे गृहमंत्री होते, तरी ते 'काँग्रेसचेच' होते ना? मग तुला त्यांचा पुतळा उभारावासा वाटला! पण तू जिथून आलास त्या हेडगेवारांचा किंवा गोळवळकरांचा पुतळा उभारावासा का नाही वाटला? प्रचारक होतास ना तू?" मोदींनी लोकसभेत केलेल्या भाषणावरुन आधीच काँग्रेससह विरोधकांनी तीव्र टीका केली होती. आता राज ठाकरेंनीही व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.
पुढील स्लाईडवर राज ठाकरे यांनी रेखाटलेले व्यंगचित्र.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.