आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचा अमित शहांवर व्यंगचित्रातून निशाणा, लोया प्रकरण दाखवले मानगुटीवरील भूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज ठाकरे मागील काही राज्यासह देशभरातील घडामोडीवर व्यंगचित्राद्वारे भाष्य करत आहेत. मंगळवारी काढलेल्या ताज्या व्यंगचित्राद्वारे राज ठाकरेंनी भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहांवर निशाणा साधला आहे. न्यायमूर्ती लोया प्रकरण अमित शहांच्या मानगुटीवर भूत म्हणून बसले आहे असे त्यांना त्यातून सूचवायचे आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी व्यक्त केलेल्या शंकेनंतर गाडले गेले न्यायमू्र्ती लोया यांचे प्रकरण उकरले जाणार आहे व त्यातून अमित शहा अडचणीत येणार आहेत असे राज ठाकरेचे व्यंगचित्र सूचवत आहे. 

 

काय रेखाटलय राज ठाकरेंनी-

 

गाडले गेलेले न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरण सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी व्यक्त केलेल्या शंकेमुळे वर आले, असे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. तसेच कबरीतून एक हातही वर आलेला दिसतोय. तर दुसरीकडे अमित शहांना धूम ठोकताना दाखवण्यात आले आहे. ‘कबरची खबर’ असे या व्यंगचित्राला नाव देण्यात आले आहे. 

 

राज ठाकरे यांनी मागील आठवड्यापासून काही विषयावर भाष्य करत राजकीय-सामाजिक घडामोडीवर फटकारे मारले आहेत. यात हजयात्रेचे दिले जाणारे अनुदान, गुजरातमध्ये कोण जिंकल कोण हारलं, शिवसेनेची भाजपला सोडचिठ्ठी तसेच राज्यातील जातीय दलदलीवर भाष्य करताना शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याचा सल्ला राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्राद्वारे दिला होता. आज न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत भाष्य करताना अमित शहांचा पाय खोलात गेल्याचे दाखवले गेले आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, राज ठाकरेंनी मागील 10 दिवसात कोणत्या कोणत्या विषयावर भाष्य करत फटकारे मारले आहेत.....

बातम्या आणखी आहेत...