आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक; कॉल डिटेल रेकॉर्ड प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रजनी पंडित - Divya Marathi
रजनी पंडित

मुंबई- राज्यातील पहिल्या महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना ठाणे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. कॉल डिटेल रेकॉर्ड प्रकरणात त्यांच्यावर कारवाई  करण्यात  आली. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी चार गुप्तहेरांना पोलिसांनी अटक केली होती.  कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणात नागरिकांचे कॉल रेकॉर्ड गुप्तपणे काढले जायचे. त्यानंतर ते रेकार्ड  विकायच्या, असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. रजनी पंडित यांना लेडी जेम्स बाँड असेही संबोधले जाते. १९९१ मध्ये त्यांनी अधिकृतपणे खासगी गुप्तहेर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. दरम्याना, रजनी यांचे वडील शांताराम पंडित हे पोलिस दलात अधिकारी होते. रजनी पंडित यांनी  आजवर जवळपास साडेसात हजार  प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचा तडा लावला. तसेच रजनी पंडित यांनी फेसेस आणि मायाजाल नावाचे दोन पुस्तकेही लिहिली असून त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली होती.

बातम्या आणखी आहेत...