आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांत यांच्‍या पत्‍नीने घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सुप्रसिद्ध तामिळ अभिनेते शिवाजीराव गायकवाड उर्फ रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांनी आज महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतील कृष्णकुंज या राज ठाकरेंच्‍या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी राज ठाकरेंच्‍या पत्‍नी शर्मिला ठाकरेदेखील उपस्थित होत्‍या.

 

ही एक सदिच्‍छा भेट असल्‍याचे राज ठाकरेंनी आपल्‍या फेसबुक पेजवर सांगितले आहे. मात्र रजनीकांत यांनी नुकत्‍याच एका राजकीय पक्षाची स्‍थापना केली असून आगामी तामिळनाडू विधानसभेमध्‍ये आपला पक्ष सर्व 234 जागा लढेल, असे रजनीकांत यांनी म्‍हटले आहे. या पार्श्‍वभुमीवर या भेटीमागे काही राजकीय अर्थ तर नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. 

मात्र आपल्‍या फेसबुकपेजवर केलेल्‍या पोस्‍टमध्ये राज ठाकरेंनी ही केवळ औपचारीक भेट असल्‍याचे म्‍हटले आहे. या भेटीदरम्‍यान उभयतांत राजकारण, समाजकारण, सिनेमा अशा अनेक विषयांवर चर्चा झाली, असे राज ठाकरेंनी म्‍हटले आहे.    


पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...