आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघर पोटनिवडणूक: उद्धव ठाकरे-योगी आदित्यनाथ सामना, उत्तर भारतीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवेसेना आणि भाजप याच्यात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात टोकाची टिका करण्यास सुरूवात केली आहे. आता दोन्ही पक्षातील हा वाद आणि टोकाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, भाजपने उत्तर भारतीय मतांना आपल्याकडे खेचण्यासाठी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांना निमंत्रण दिले आहे. येत्या 23 मे रोजी योगी आदित्यनाथ हे पालघरमध्ये येणार आहे. विषेश म्हणजे याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील पालघरमध्ये येणार आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे विरूद्ध योगी आदित्यनाथ असा सामना पहायला मिळणार आहे.

 

योगी-उद्धव आमने सामने येणार....
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि योगी आदित्यनाथ या दोन्ही बड्या नेत्यांची सभा एकाच दिवशी एकाच ठिकाणी असल्यामुळे भाजप शिवसेना वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे. येत्या बुधवारी 23 मे ला नालासोपाऱ्यात योगी आदित्यानाथ यांची जाहिर सभा होणार आहे. नालासोपाऱ्यात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार आहेत. या मतदारांना आवाहन करण्यासाठी भाजपकडून उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांना पाचारण करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांची सभा देखील नालासोपाऱ्यातच होणार आहे. 

 

भारतीय जनता पार्टीचे पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यामुळे तेथे पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीचा ज्वर वाढत असतानाच वनगा यांच्या कुटुंबीयानी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेने चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना लोकसभा पोटनिवडणुकीतही उतरवले. त्यामुळे भाजपाने घाईघाईत काँग्रेसमधून पक्षात दाखल झालेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. बहुजन विकास आघाडीनेही या निवडणुकीत आपले पूर्वीचेच खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथे दामोदर शिंगडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...