आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना 7 तारखेपर्यंत कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सीडीआरप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी अटक केलेल्या प्रख्यात खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना न्यायालयाने शनिवारी ७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ठाणे पोलिसांनी त्यांना दादरमधून अटक केली होती. ठाणे पोलिसांनी काही विशेष लोकांचे फोन कॉल रेकॉर्ड करून ते विकल्याच्या आरोपावरून चार खासगी गुप्तहेरांना अटक केली होती. दिल्लीच्या एका अज्ञात व्यक्तीला हाताशी धरून कॉल डेटा रेकॉर्ड चोरून  तो लोकांना विकायचा असा धंदा ही टोळी करत होती, असा पोलिसांना संशय आहे. संतोष पंडगळे आणि प्रशांत सोनावणे या गुप्तहेरांकडून १७७ सीडीआर पोलिसांनी जप्त केल्या होत्या. त्यांनी दिलेल्या माहितीवरून रजनी पंडित यांना दादर येथून अटक केली होती.  

बातम्या आणखी आहेत...