आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुलभ शौचालयात युवतीवर बलात्काराचा प्रयत्न, मुंबईत महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सुलभ शौचालयात एका 22 वर्षीय युवतीवर बलात्काराचा करण्याचा प्रयत्न केल्याची घटना भिवंडी येथील संगमपाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. दीपक भोईर (वय 47) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

 

ठाणे आणि मुंबईत महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. पीडित युवतीच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला आहे. आरोपी मागील अनेक दिवसांपासून या युवतीला त्रास देत होता तसेच तिच्याकडे मोबाईल नंबर मागत होता. सोमवारी दुपारी ही युवती एकटी होती. ज्यावेळी ती सार्वजनिक शौचालयात एकटी चालली हाती तेव्हा त्याने तिचा पाठलाग केला आणि तिच्यामागे शौचालयात शिरला आणि दरवाजा बंद करुन तिच्यासमोर अश्लील हरकती करु लागला. युवतीने आरडाओरडा करताच तो पळून गेला. युवतीने लगेच निजामपूर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या घटनेनंतर ही युवती भेदरलेल्या अवस्थेत आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...