आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​रेशनकार्ड-आधार लिंक; मुदतीत वाढ करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रेशनकार्ड आधार क्रमांकाशी लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मुदतीत वाढ करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला अाहे. आधार लिंकसाठी शेवटची तारीख ३१ मार्च २०१८ आहे.
  
दुसरीकडे, अर्जदारांना रेशनकार्डच्या डिजिटायझेेशनमध्ये येत असलेल्या अडचणी तत्काळ दूर कराव्यात, असे निर्देशही हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले अाहेत. या अडचणींमुळे अद्यापही लाखो नागरिकांचे रेशनकार्ड आधारशी लिंक झालेले नाही. न्या. शंतनू केमकर आणि न्या. राजेश केतकर यांच्या न्यायपीठाने नाशकातील सामाजिक कार्यकर्ते अझीझ पठाण यांच्या याचिकेवर हे निर्देश दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...