आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंची बदनामी; अंजली दमानियांवर अटक वाॅरंट जारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खडसेंनी दमानियाविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता, आता दमानियाविरोधात पकड वॉरंट जारी करण्यात आले आहे. - Divya Marathi
खडसेंनी दमानियाविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता, आता दमानियाविरोधात पकड वॉरंट जारी करण्यात आले आहे.

रावेर- माजी मंत्री एकनाथ खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी रावेरचे भाजप तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीत दमानिया सातत्याने गैरहजर राहिल्याने गुरुवारी न्यायालयाने त्यांच्याविराेधात अटक वाॅरंट काढले अाहे. हे वाॅरंट न्यायालयामार्फत सांताक्रूझ पोलिस ठाण्यात जाईल. यानंतर सांताक्रूझ पोलिस दमानियांना यांना रावेर न्यायालयात हजर करतील.   


भोसरी भूखंड, जावयाची लिमोझीन कार, अपसंपदा जमा करणे, स्वीय सहायकाचे लाचप्रकरण आदी विषयांवर दमानियांनी  खडसेंवर आरोप केले हाेते. यातून त्यांची बदनामी झाल्याची तक्रार पाटील यांनी केली हाेती. तसेच दमानियांविराेधात जून २०१६मध्ये रावेर न्यायालयात खटला दाखल कण्यात अाला हाेता. या खटल्याचे समन्स प्राप्त होऊनही दमानिया न्यायालयात हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे गुरुवारी रावेर न्यायालयाने त्यांच्याविराेधात वाॅरंट काढले अाहे.

 

पुढे स्लाईडद्वारे यासंबंधित वाचा व पाहा....

बातम्या आणखी आहेत...