आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंची सून मितालीला आहे या गोष्टींची आवड; असे आहेत अमित ठाकरेंचे सासु-सासरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिताली बोरुडे यांचा राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याशी सोमवारी साखरपुडा झाला आहे. - Divya Marathi
मिताली बोरुडे यांचा राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याशी सोमवारी साखरपुडा झाला आहे.

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा सोमवारी मिताली बोरुडे यांच्यासोबत साखरपुडा झाला. या समारंभास मोजक्याच लोकांनी हजेरी लावली. मिताली ही फेमस ओबेसिटी सर्जन संजय बोरुडे यांची मुलगी आहे. divyamarathi.com तुम्हाला आज बोरुडे यांच्या कुटुंबियांविषयी काही माहिती देणार आहे.

 

 

मिताली यांच्याविषयी...
- मिताली बोरुडे यांनी आपल्या फेसबुक प्रोफाइलवर आपल्याला अॅडव्हॅचर आवडत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सप्टेंबर महिन्यात युएईमध्ये अॅटलांटिक पाल्म बीच रिसॉर्टमध्ये डॉल्फिनसोबतचा एक व्हिडिओही शेअर केलेला आहे.
- मिताली दुबईतील फैड या आंतरराष्ट्रीय संस्थेतुन फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम केला आहे. 

 

 

देशातील प्रसिध्द ओबेसिटी सर्जन आहेत डॉ. संजय बोरुडे
- 1989 पासून प्रॅक्टिस करणारे डॉ. संजय बोरुडे हे देशातील मोजक्या प्रसिध्द ओबेसिटी सर्जनपैकी एक आहेत. त्यांनी लैप बैंड आणि गॅस्ट्रिक बायपास सर्जरी या विषयांमध्ये स्पेशलायजेशन केले आहे.

- डॉ. संजय यांनी बेल्जियम आणि स्पेनमध्ये ओबेसिटी सर्जरीची ट्रेनिंग घेतली आहे. ते मुंबईतील कॉलेज ऑफ फिजिशियन अॅन्ड सर्जन मध्ये ओबेसिटी सर्जरीचे प्राध्यापक आहेत.

 

 

सगळ्यात जाडजुड मुलीवर केले होते उपचार
- डॉ. संजय बोरुडे 2011 मध्ये मुंबईतील जोया खान हिच्यावर केलेल्या उपचारामुळे चर्चेत आले होते.
- जोआ खान ही अतिशय दुर्मिळ अशा आजाराशी झुंज देत होती. 
- डॉ. संजय यांनी तिच्यावर उपचार करत तिचे वजन आटोक्यात आणले. जर तिच्यावर वेळीच उपचार केले नसते तर तिला प्राणाला मुकावे लागले असते. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...